Annabhau Sathe Karj Yojana लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज योजना

Annabhau Sathe Karj Yojana

Annabhau Sathe Karj Yojana कर्जामध्ये महामंडळाचा हिस्सा रु. 85 हजार (85%), अनुदान रक्कम रु. 10 हजार (10%), अर्जदाराचा सहभाग रु.5 हजार (5%) असे एकूण 1 लाख रुपये कर्ज (100%) देण्यात येते. तीन वर्ष (36 महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा 4 टक्के व्याजदराप्रमाणे कर्ज दिले जाते. या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी  एकूण 65 लाभार्थींचे रक्कम रु. 65 लाखांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

Annabhau Sathe Karj Yojana पात्रता व निकष : 

  • अर्जदार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा जातीतील असावा. 
  • अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. 
  • अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. 
  • अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे. 
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. 
  • अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. 
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षीत असावा. 
  • अर्जदाराचा Cibil Credit Score 500 च्या वर असावा.
हे वाचले का?  Annasaheb Patil Mahamandal Loan आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील युवकांना उद्योजकतेसाठी अर्थसहाय्य : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ..

येथे क्लिक करून पहा कर्ज प्रक्रिया

आवश्यक कागदपत्रे : 

  • सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला जातीचा दाखला,
  • अर्जदाराच्या कुटुंबाचा तीन लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला, 
  • नुकतेच काढलेले दोन फोटो,
  • अर्जदाराचा शैक्षणिक पुरावा/शाळेचा दाखला,
  • आधार कार्ड, 
  • रेशनकार्ड, 
  • पॅनकार्ड,
  • ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागा उपलब्धतेचा पुरावा ( भाडे पावती, करारपत्र), 
  • व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभव दाखला,
  • यापूर्वी शासकीय कर्ज योजनेचा व अनुदानाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 
  • शॉप ॲक्ट/ग्रामसेवकाचे व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला. 
  • व्यवसायासंदर्भात साहित्य/माल खरेदीचे दरपत्रक/कोटेशन,
  • अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे/करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

येथे क्लिक करून पहा कर्ज प्रक्रिया

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  Anandacha Shida गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top