Bandhkam Parvana Gram Panchayat

Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी

बांधकाम परवानगी आवश्यक कागदपत्रे-

  1. विहित नमुन्यातील अर्ज
  2. जागेच्या मालकीची कागदपत्रे.
  3. मंजूर लेआऊट (Plan Layout).
  4. बिल्डींग प्लान (P- Line सहित).
  5. विकास शुल्क व कामगार उपकर संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याची पावती.
  6. आर्किटेचेरचा विहित नमुन्यातील दाखला.

बांधकाम परवानगी कर (Tax)-

i ) विकास शुल्क-

विकास शुल्क हे नगरविकास विभाग, MRTP Act- 1966 खंड 124 (B) नुसार

अ) जमीन विकास शुल्क-

  1. रहिवासी बांधकाम- भूखंड क्षेत्र जमिनीचे रेडीरेकनर दर प्रती चौ. मी दरच्या 1/2%                                                                         
  2. व्यवसाईक बांधकाम- रहिवासी बांधकाम- भूखंड क्षेत्र जमिनीचे रेडरेकनर दर प्रती चौ. मी दरच्या 1%.

आ) बांधकाम विकास शुल्क-

  1. रहिवासी बांधकाम- भूखंड क्षेत्र जमिनीचे रेडीरेकनर दर प्रती चौ. मी दरच्या 2%                                                                        
  2. व्यवसाईक बांधकाम- रहिवासी बांधकाम- भूखंड क्षेत्र जमिनीचे रेडरेकनर दर प्रती चौ.मी दरच्या 4%. 

आपल्याला एकूण भरावे लागणारे विकास शुल्क= जमीन विकास शुल्क+ बांधकाम विकास शुल्क

वरील विकास शुल्क आपल्याला ग्रामपंचायतीकडे ग्रामनिधी मध्ये जमा करून त्याची नोंद करून पावती घ्यावी व त्याची स्वतंत्र नोंद झाली क याची खात्री करून घ्यावी. आता मित्रांनो हे झालं विकास शुल्क बाबत आता यापुढे जाऊन आपल्या कडून अजून एक नवीन टॅक्स ग्रामपंचायत कडून घेतल्या जाणार त्याचं नाव आहे कामगार उपकर

ii ) कामगार उपकर-

तो म्हणजे उद्योग ऊर्जा व कामगार गणेश शासन निर्णय क्रमांक 17/06/2010 व 21/07/2011 अन्वये बांधकाम उपकर= बांधकामाची किंमत 1% ( बांधकाम किंमत= बांधकाम क्षेत्र चौ.मी रेडीरेकनर दर प्रति चौ.मी).

आपण आज या लेखात बघितले की बांधकाम परवानगी करता ग्रामपंचायत मध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे व आपल्याला भरावा लागणारा टॅक्स या संबंधित सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण केला आहे लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

आपण जर श हरी भागातील रहिवासी असाल आणि नगर परिषद, नगर पालिका आणि महानगर पालिका यांच्या हद्दीतील परवाना कसा काढावा या विषयी जर माहिती हवी असेल तर पोस्ट खाली कमेंट करावी आपणासाठी पोस्ट तयार केली जाईल.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Bandhkam Parvana Gram Panchayat व्हिडीओ पहाण्यासाठी खालील क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top