सावकारी कर्ज माफ होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

सावकारी कर्ज माफ होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
सावकारी कर्ज माफ होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
सावकारी कर्ज माफ होणार

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले सावकारी कर्ज माफ होणार शासनामार्फत संबंधीत सावकारास कर्ज अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या सावकारी कर्ज माफ होणार, सोबतच कार्य क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात आले होते.

त्यानुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णय क्र. १ मधील सदर अट रद्द करून ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे त्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय क्र. २ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाडयातील १४ जिल्हयांतील ३७४९ कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज रक्कम रु. ९०४ कोटी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे.

सदर कर्जाची परतफेड करण्यासाठी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रु.५.०० कोटी इतक्या रक्कमेची तरतूद करण्यात आलेली असून वित्त विभागाने संदर्भाधीन शासन निर्णय क्र. ३ अन्वये सदर तरतूदींपैकी ५०% निधी खर्च करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार रु. २.५० कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

हे वाचले का?  कृषी कर्ज मित्र योजना सुरू शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज मिळणार

शासन निर्णय:-

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील मंजूर तरतूदीमधून रु.२.५० कोटी इतका निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

सदर तरतूद खर्च करण्यासाठी (V०००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक (अंदाज व नियोजन) सहकार आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

तसेच लेखाधिकारी अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

सदर निधी आहरण करुन हा खर्च वेळेत होईल हे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पहावे. तसेच याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी

हे वाचले का?  सिंचन विहीर अनुदान योजना | Sinchan Vihir Anudan Yojana

सदर खर्च हा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या विभागाच्या मागणी क्र. व्ही-२, २४२५, सहकार ( ००) (०१) परवानाधारक सावकाराकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड (कार्यक्रम) (दत्तमत) ३३ अर्थसहाय्य (२४२५२४४४) या लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ या वर्षासाठी मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

उक्त निधी वितरीत करताना संदर्भाधीन शासन निर्णय क्र. १ व २ मध्ये नमूद कार्यपद्धतीचा अवलंब करुन त्यानुसार अटी / शर्तीची तंतोतंत पुर्तता झाल्यानंतरच सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी अनुदानाचे वाटप करावे.

तसेच सदर योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी योजनेचे संनियंत्रण करावे. सदर निधीमधून वितरीत करण्यात आलेल्या रकमेबाबतचा जिल्हानिहाय तपशीलवार अहवाल प्रतीमहा शासनास सादर करावा.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१११२३१७००३८४५०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

हे वाचले का?  ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश GR

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

सावकारी कर्ज माफ होणार शासननिर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top