- जेष्ठ नागरिक बचत योजना:
वृद्धांसाठी खास योजना सुरू करण्यात आली आहे. 55 वर्षांवरील निवृत्त व्यक्ति किंवा वयाची 60 वर्षे पूर्ण केलेली कोणती व्यक्ति खाते उघडू शकते. जे कोणाला संयुक्त खाते उघडायचे असेल तर संयुक्त खाते सुद्धा उघडता येते.
या योजनेचे व्याज हे एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी दिले जाते. या योजनेद्वारे तुम्हाला 8.20% व्याज मिळते.
- पोस्ट ऑफिस बचत योजना:
या योजने अंतर्गत तुम्ही कमीत कमी 500 रुपये जमा करू शकतात. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही.
या योजने अंतर्गत तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. व्याजदर हा 4 % आहे.
- किसान विकास पत्र:
शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस ची ही योजना आहे. परंतु या योजनेत कोणीही आपले खाते उघडू शकते. या योजनेत जमा केलेले पैसे काही काळानंतर दुप्पट होतात. या योजनेद्वारे 7.5% व्याज मिळते.
- आवर्ती ठेव योजना:
ही एक सरकारी बचत योजना आहे. या योजनेमध्ये कमीत कमी 500 रुपये जमा करता येतात. या योजनेत तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याची मर्यादा नाही. या योजनेचा परिपक्वता कालावधी हा 5 वर्षांचा आहे. 5 वर्षांच्या कालावधी साठी 6.5% व्याज मिळते.
- सुकन्या समृद्धी योजना :
खास मुलींसाठी शासनाने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेत कमीत कमी 250 रुपये जमा करता येतात तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात.
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर हे खाते बंद केले जाऊ शकते. या योजनेचा परिपक्वता कालावधी हा 21 वर्षांचा आहे. या योजनेत 8% दराने वार्षिक आधारावर व्याज मिळते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.