Senior Citizen Saving Scheme ज्येष्ठ नागरिक बचत योजना

जेष्ठ नागरिक योजना फायदा:

उच्च व्याजदर:

दर तीन महिन्यांनी व्याज दराचा आढावा घेतला जातो. इतर गुंतवणुकीच्या पर्यायापेक्षा या योजनेत व्याज दर जास्त आहे. या योजनेमध्ये 7.4 टक्के व्याज दर आहे.

कर लाभ:

या योजनेत ज्येष्ठ नागरिक दरवर्षी कर सुट मागू शकतात. या योजनेत गुंतवणूक करून 1.5 लाख रुपयांची कर सवलत मिळू शकते

हमी परतावा:

ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक सुरक्षित बचत योजना आहे

या योजनेत कुठल्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूकदार एक रकमी रक्कम जमा करू शकतात. जमा करताना रक्कम चेक द्वारे किंवा रोख करता येते.

ज्या तारखेला खाते उघडले त्यानंतर पाच वर्षांनी जेष्ठ नागरिक बचत योजना परिपक्व होते पाच वर्षानंतर अतिरिक्त तीन वर्षांसाठी खाते वाढवता येते.

मुदतपूर्ती पूर्वी पैसे काढण्याचे नियम:

जर काही कारणास्तव या योजनेतील पैसे काढावयाचे असतील तर त्यासाठी काही नियम आहेत.

या योजनेत मुदत संपण्याआधी पैसे काढण्यास परवानगी आहे. परंतु त्यासाठी काही दंड लागू होतो. समजा जर योजनेचा लाभ घेण्यास सुरू केल्यापासून दोन वर्षं आधीच बंद केल्यास गुंतवणूक केलेल्या रकमे पैकी पाच टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाते.

दोन ते पाच वर्षांपर्यंत या योजनेतून बाहेर पडल्यास एक टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाते.

बचत योजना लाभार्थीचा मृत्यू झाल्यास:

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीचा योजना परिपक्व होण्यापूर्वीच मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीच्या वारसदारांना गुंतवणूक केलेली सर्व रक्कम परत केली जाते. त्यासाठी वारसदारांना लाभार्थीचे मृत्यूपत्र व लेखी अर्ज सादर करावा लागतो.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
  2. Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
  3. office delay act दप्तर दिरंगाई कायदा 2006
  4. Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
  5. Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top