Post Office Schemes ह्या आहेत पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 बचत योजना!!!

Post Office Schemes PPF खाते योजना :

PPF खाते योजना ही मोठ्या कामांसाठी पैसे गोळा करण्यास मदत करते. या खात्यात दरवर्षी किमान 500 ते कमाल 1.50 लाख रुपये जमा करू शकता. यामध्ये तुम्ही 1.63 लाख ते 40 लाख रुपये 15 वर्षात लहान रक्कम जमा करून जमा करू शकता.

ही योजना मुलांचे लग्न, शिक्षण किंवा घर यासारखी मोठ्या रकमेची कामे पूर्ण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. सध्या (जानेवारी 2023 मध्ये) सरकार त्यावर 7.1% व्याज देत आहे. त्याची ठेव, व्याज आणि मॅच्युरिटी, तिन्ही करमुक्त आहेत.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना :

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना post office monthly income scheme ही दर महिन्याला पॉकेट मनीसाठी चांगली योजना आहे. या योजनेत, पुढील 5 वर्षांसाठी, तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या बदल्यात तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम मिळते. ही रक्कम त्या ठेवीवरील व्याजाच्या स्वरूपात असते. 5 वर्षानंतर, तुमची ठेव रक्कम देखील परत केली जाते.

2023 च्या अर्थसंकल्पात सरकारने त्यात पैसे जमा करण्याची मर्यादाही 4.50 लाखांवरून 9 लाख रुपये केली आहे. संयुक्त खात्याची मर्यादाही 9 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2023 पासून सरकारने त्याचा व्याजदर 6.7% वरून 7.1% पर्यंत वाढवला आहे.

सुकन्या समृद्धी योजना :

मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी सर्वोत्कृष्ट बचत योजना म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना होय या योजनेवर सरकार सध्या 7.6% व्याज देत आहे त्याच्या ठेवी आणि व्याजावरही करा मध्ये सूट मिळते. केवळ 250 रुपयांमध्ये खाते उघडले जाते. आणि दरवर्षी दीड लाख रुपये जमा करता येतात लहान रक्कम जमा करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी 1.27 लाख ते 63.65 लाख रुपये परत मिळवू शकता.

जमा झालेला पैसा मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी तसेच व्यवसायासाठी सुद्धा वापरता येईल. मुलीचे लग्न शिक्षण किंवा आजारपणावर खाते बंद करूनही पैसे मध्यंतरी काढता येतात याच वैशिष्ट्यांमुळे याला मुलींसाठी सर्वोत्तम योजना असे म्हटले जाते.post office scheme to double the money

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. MMRDA Recruitment मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. FCI Recruitment FCI भारतीय खाद्य महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!
  3. Pune Anganwadi Bharti पुणे जिल्हा परिषद अंतर्गत, ‘अंगणवाडीच्या’ पदांसाठी भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top