Consumer Grievance Redressal Forum ग्राहक तक्रार निवारण मंच कडे तक्रार कशी करावी…..?

ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे अर्ज दाखल करतेवेळी व त्‍याची छाननी करतेवळी तक्रारदार/वकिल/अधिकृत प्रतिनिधी/वटमुखत्‍यारपत्रधारक यांना सुचना

[ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील कलम 12 अनुसार ग्राहक तक्रार अर्ज करणेची कार्यपध्‍दती]
1] खरेदी केलेली वस्‍तू अगर त्‍या उद्देशाने दिलेली वस्‍तू अथवा पुरविलेली सेवा अगर पुरविण्‍यास संम्‍मती दिलेल्‍या सेवेच्‍या संदर्भात जिल्‍हा मंचासमोर खालील व्‍यक्‍ती तक्रार दाखल करु शकतात :-

(अ) ग्राहक (व्‍यक्ति)
(ब) कोणतीही मान्‍यताप्राप्‍त ग्राहक संस्‍था/संघटना
(क) एक किंवा अनेक ग्राहक सारख्‍याच हेतूकरिता प्रातिनिधिक तक्रार अर्ज दाखल करु शकतात.

[2] तक्रारदार हे व्‍यक्तिश:/मालक/प्रतिनिधी मंडळ/भागीदारी संस्‍था आहेत किंवा कसे याबाबत तक्रार अर्जात स्‍पष्‍ट नमूद करावे.

[3] तक्रार अर्जामध्‍ये तक्रारदाराचे संपूर्ण नांव, पिनकोड, गल्‍ली/रस्‍ता, इमारतीचे नांव इत्‍यादीसह अचूक टपाल-पत्‍ता नमूद करावा. तसेच, तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रार अर्जात भ्रमणध्‍वनी क्रमांक व ई-मेल नमूद करावा.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

[4] ग्राहक तक्रार अर्ज (राज्‍यभाषा म्‍हणून) मराठीत अगर इंग्रजी भाषेत करावा.
[5] कागदपत्रे व शपथपत्र दाखल करावे.

[6] तक्रार अर्जामध्‍ये तक्रारीस कारण कधी व कोठे घडले याबाबत स्‍पष्‍टपणे कथन करावे, जेणेकरुन तक्रार अर्ज मुदतीत आहे किंवा कसे ठरविता येईल.
[7] तक्रारीस कारण घडलेपासून ग्राहक तक्रार अर्ज दोन वर्षाच्‍या मुदतीत दाखल करणे अनिवार्य आहे.

[8] तक्रार अर्जामध्‍ये जाबदाराचे संपूर्ण नांव, पिनकोड, गल्‍ली/रस्‍ता, इमारतीचे नांव इत्‍यादींसह अचूक पत्‍ता नमूद करावा. तसेच, जाबदाराचा भ्रमणध्‍वनी क्रमांक व ई- मेल नमूद करावा.

[9] ग्राहक तक्रार अर्ज व्‍यक्ति/मालक/प्रतिनिधी मंडळ/भागीदारी संस्‍था यांचेविरुध्‍द आहे किंवा कसे याबाबत स्‍पष्‍ट कथन करावे.
[10]ग्राहक तक्रार अर्ज व त्‍यासोबतचे कागदपत्रे व्दिप्रतीत सादर करावीत.

[11]ग्राहक तक्रार अर्जासोबत देय शुल्‍काचा धनाकर्ष जोडावा राज्‍य आयोगात दाखल करतेवेळी ‘प्रबधंक प्रशासन, राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्‍ट्र, मुंबई’ या नांवाने व जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचापुढे दाखल करताना ‘अध्‍यक्ष जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच (जिल्‍हा मंचाचे नाव)” या नावाने काढलेला असावा.

[12]सदरचा धनाकर्ष हा राष्‍ट्रीयकृत बँकेचा असावा.

[13] ग्राहक तक्रार निवारण मंच देय शुल्‍क दर्शविणारे कोष्‍टक/तक्‍ता :-

consumer court complaint
https://grahak.maharashtra.gov.in/1106/Contact-Us

दारिद्रय रेषेखालील अंत्‍योदय अन्‍न योजना कार्डधारक असणा-या तक्रारदारांनी सदर कार्डाची साक्षांकित प्रत दाखल केलेस ते सदर देय शुल्‍क अदा करण्‍यापासून सुट मिळणेत पात्र राहतील.

[14] ग्राहक तक्रार अर्ज अशा जिल्‍हा ग्राहक मंचाकडेक दाखल केला जाईल की ज्‍याच्‍या क्षेत्रिय अधिकारितेच्‍या सीमेत –
(अ) जाबदार राहतो/व्‍यवसाय करतो/व्‍यवसायाची शाखा आहे/नफ्याकरिता व्‍यक्तिश: काम करतो.
(ब) जाबदारांपैकी कोणही एक राहतो/व्‍यवसाय करतो/शाखा आहे/नफ्याकरिता काम करतो.
(क) तक्रारीस पूर्णत: अगर अंशत: कारण घडले असेल.

[15] वीस लाख रुपयांपेक्षा जास्‍त मुल्‍य नसलेल्‍या वस्‍तु/सेवा आणि नुकसान भरपाई इत्‍यादीचे एकूण वीस लाख रुपयांपेखा जास्‍त आर्थिक मुल्‍य नसलेलेच ग्राहक तक्रार अर्ज विचारार्थ घेण्‍याची जिल्‍हा ग्राहक मंचास अधिकारिता आहे.

(क) ग्राहक तक्रार अर्ज लेजर पेपरवर डाव्‍या बाजूस ¼ इतका व उजव्‍या बाजूस 1/8 इतका समास सोडून डबल स्‍पेस अंतरात सुवाच्‍च अक्षरात लिहिला/टंकलिखित करावा. तसेच, ग्राहक तक्रार अर्जाची सुरवात पहिले अर्धे पान कार्यालयीन नोंदीकरिता कोरे सोडून खालील अर्ध्‍या पानापासून करावी.

(ख) ग्राहक तक्रार अर्ज राज्‍य आयोगसमोर दाखल करावयाचा असलेस ‘मा.राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्‍ट्र यांचेसमोर’ आणि जिल्‍हा ग्राहक मंचासमोर दाखल करावयाचा असलेस ‘मा.जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ………….यांचेसमोर’ असे शिर्षक/मथळा द्यावा.

(ग) ग्राहक तक्रार क्रमांक व लॉजिंग नंबर नमूद करणेकरिता अर्जाच्‍या उजव्‍या बाजूस जागा सोडावी.

(घ) तक्रारदार ही व्‍यक्ति असलेस ग्राहक तक्रार अर्जाचे कलमनाम्‍यामध्‍ये त्‍याचे/तिचे स्‍वत:चे नांव तसेच वडिलांचे आणि/किंवा पतीचे नांव व आडनांव नमूद करावे. तसेच, वय, व्‍यवसाय, पत्रव्‍यवहाराकरिता तपशीलवार पत्‍ता, दूरध्‍वनी क्रमांक, भ्रमणध्‍वनी क्रमांक व ई-मेल आय.डी. नमूद करावा. जर तक्रार अर्ज अधिकृत प्रतिनिधी/वटमुखत्‍यारपत्रधारकामार्फत दाखल केला जात असलेस तसे कलमनाम्‍यामध्‍ये स्‍पष्‍ट करावे व अधिकार-पत्र/वटमुखत्‍यारपत्र जोडावे­­.

(च) जर, कायदेशीर व्‍यक्‍ती, म्‍हणजेच – खाजगी कंपनी आणि/अथवा सार्वजनिक कंपनी आणि/अथवा सहकारी संस्‍था अधिनियम, 1961 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्‍था आणि/अथवा संस्‍था नोंदणी अधिनियम, 1860 खाली नोंदणीकृत संस्‍था आणि/अथवा बॉम्‍बे सार्वजनिक विश्‍वस्‍त अधिनियम अंतर्गत प्रस्‍थापित न्‍यास आणि/अथवा भागीदारी संस्‍था आणि/अथवा अन्‍य विधिमान्‍य व्‍यक्‍ती हे तक्रारदार आणि/अथवा जाबदार असतील तर त्‍यांचा व व्‍यवस्‍थापनातील अधिकृत व्‍यक्‍तीचा तपशील द्यावा­.

(छ) जर, तकार अर्ज विधिमान्‍य व्‍यक्‍ती तर्फे दाखल केला जात असेल तर तक्रार अर्जासोबत व्‍यवस्‍थापन मंडळाने तक्रार अर्ज अधिकृत व्‍यक्तिमार्फत दाखल करीत असलेबाबत व सदरचा तक्रार अर्ज, त्‍यासोबतचे कागदपत्रांवर व शपथपत्रावर स्‍वाक्षरी करण्‍याचे अधिकार दिलेबाबत पारित केलेला ठराव दाखल करणेत यावा.

(ज) जेंव्‍हा जाबदार ही विधिमान्‍य व्‍यक्ति असेल तर तिला नोटीस लागू झालेनंतर तिच्‍या अधिकृत प्रतिनिधी/व्‍यक्‍तीने त्‍यास अधिकृत केलेबाबतचे अधिकार-पत्र, तसेच मुख्‍यालयाचे, आणि जर शाखा पक्षकार असेल तर, शाखेच्‍या संपर्काचे तपशिल द्यावेत.

(झ) ग्राहक तक्रार निवारण मंच कडे अर्ज दाखल करतेवेळी जर व्यवस्थापनातील सध्‍याच्‍या व्‍यक्तिव्‍यतिरिक्‍त अगोदरच्‍या व्‍यक्‍ती वस्‍तू/सेवेतील त्रुटीकरिता जबाबदार आहे/आहेत असे स्‍पष्‍ट होत असेल तर सध्याच्या व्‍यक्‍तींबरोबरच अगोदरच्‍या व्‍यवस्‍थापनातील व्‍यक्‍तींनासुध्‍दा जाबदार म्‍हणून सामील करावे.

(ट) कलमनाम्‍यानंतर तक्रारीच्‍या उजव्‍या बाजूला तक्रार दाखल करतेवेळी जिल्‍हा मंचाची आर्थिक अधिकारिता निश्चित होणेचे दृष्‍टीने दाव्‍याची एकूण रक्‍कम व जमा केलेल्‍या शुल्‍काची रक्‍कम दर्शवावी व त्‍याच्‍याच खाली तक्रार अर्ज कोणत्‍या तरतुदीखाली दाखल केला ती तरतूद नमूद करावी.

(ठ) तदनंतर, तक्रारीचा मुख्‍य भाग, ज्‍यामध्‍ये तक्रारीस कारण कधी, कुठे व कसे घडले याबाबत मुददेसूद कथन करुन शेवटी प्रार्थना व तक्रारीमधील परिच्‍छेदांना अनुक्रमांक द्यावेत.

(ड) तदनंतर, तक्रार अर्जाचे उजव्‍या बाजूस तक्रारदारांने स्‍वाक्षरी करावी व डाव्‍या बाजूस जर तक्रार अर्जाचा मसूदा वकिलाने तयार केला असलेस वकिलाने सही करावी. तदनंतर, तक्रार अर्जास खालीलप्रमाणे प्रतिज्ञेवर सत्‍यापन करावे.

ग्राहक तक्रार अर्ज

प्रतिज्ञा

मी, ………………………………, वय ……. वर्षे, व्‍यवसाय – …………, श्री./सौ. …………………………….. यांचा मुलगा/मुलगी/पत्‍नी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञेवर कथन करतो/करते की, प्रस्‍तुत ग्राहक तक्रार अर्जामधील परिच्‍छेद क्र…… ते ……. मध्‍ये नमूद कथने …………………………………… यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या माहितीच्‍या आधारे केलेली आहेत, जी तक्रारदाराचे माहिती व समजूतीप्रमाणे खरी व बरोबर आहेत. तसेच, परिच्‍छेद क्र. ……. मधील कथने विधिज्ञाने दिलेल्‍या कायदेशीर सल्‍ल्‍यानुसार केलेली आहेत व ती तक्रारदाराचे माहिती व समजूतीप्रमाणे खरी व बरोबर आहेत. सदर कथनांच्‍या साक्षीपृष्‍ठयर्थ तक्रारदाराने खाली स्‍वाक्षरी केलेली आहे.
ठिकाण :- दिनांक :-
(तक्रारदाराची स्‍वाक्षरी)

(ढ) ग्राहक तक्रार अर्ज हा प्रातिनिधीक असलेस, तो चालविणेकरिता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील कलम 12 (1)(c) अन्‍वये परवानगी मिळणेबाबतचा अर्ज तक्रार अर्जासोबत जोडावा.

(ण) प्रातिनिधीक तक्रार असलेस, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील कलम 12 (1)(c) ली दाखल केलेल्‍या अर्जाबरोबरच दिवाणी प्रक्रिया संहितेमधील Order I, Rule 10 अनुसार परवानगी मागणी अर्ज तक्रार अर्जसोबत दाखल करावा.

(त) वकिलामार्फत तक्रार दाखल केली असलेस ग्राहक तक्रार अर्जासोबत योग्‍य ते वकिलपत्र दाखल करावे. अधिकृत प्रतिनिधी/मुखत्‍यारधारकामार्फत तक्रार अर्ज दाखल केला जात असलेस, अधिकार-पत्र आणि/अथवा `100/- च्‍या मुद्रांकपत्रावर मुखत्‍यारपत्र सादर करावे.

(थ) तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत जाबदार/जिल्‍हा ग्राहक मंच/राज्‍य ग्राहक आयोग यांना पत्रव्‍यवहार करता यावा याकरिता तपशीलवार व अचूक पत्‍ता नमूद करुन पत्‍ता–मेमो दाखल करावा. सदर पत्‍ता-मेमोमध्‍ये तक्रारदारांने संपर्काच्‍या दृष्‍टीने त्‍याचा दूरध्‍वनी क्रमांक, भ्रमणध्‍वनी क्रमांक व ई-मेल आय.डी नमूद करावा. तसेच, वकिल/अधिकृत प्रतिनिधी/वटमुखत्‍यापत्रधारक यांनीदेखील त्‍यांचा दूरध्‍वनी क्रमांक, भ्रमणध्‍वनी क्रमांक व ई-मेल आय.डी नमूद करावा.

(द) तक्रारदाराने ग्राहक तक्रार अर्जासोबत जोडलेल्‍या दस्‍तऐवजांची खाली दर्शविलेप्रमाणे सूची दाखल करावी.

अ.क्रकागदपत्रांचा तपशीलकागदपत्रांची संख्‍याशेरामूळ/सत्‍यप्रतपान क्रमांकपान क्र. ..

ध) सदर सूचीच्‍या शेवटी दस्‍तऐवजांची एकूण संख्‍या नमूद करावी. तक्रार अर्जासोबत जोडलेल्‍या दस्‍तऐवजांच्‍या प्रती (ज्‍या मूळप्रती नाहीत) पक्षकार/वकिलाने/अधिकृत प्रतिनिधीने/वटमुखत्‍यारधारकाने ‘सत्‍यप्रत’ म्‍हणून पृष्‍ठांकित करुन त्‍याखाली सही करावी. पक्षकार/वकिलाने/अधिकृत प्रतिनिधीने/वटमुखत्‍यारधारक यांनी केलेले सदरचे अधिप्रमाणन हे दस्‍तऐवजाचे बनावटीकरण व दाव्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ खोटे दस्‍तऐवज दाखल केले जावू नयेत याकरिता आवश्‍यक आहे.

(न) तक्रार अर्जासोबत अंतरिम मागणी करणारा अंतरिम अर्ज दाखल केला असलेस तो दस्‍तऐवजाच्‍या सूचीनंतर जोडावा व त्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ शपथपत्र दाखल करावे­.

(प) उपरोक्‍त सर्व बाबींची मंचाचे/आयोगाचे कार्यालयाने तक्रार अर्ज सादर होताना छाननी करावी आणि जर त्‍यामध्‍ये काही उणिवा/त्रुटी आढळून आल्‍यास सदरच्‍या उणिवा/त्रुटींची तक्रारदार/वकिल/अधिकृत प्रतिनिधी/वटमुखत्‍यारधारक यांचेकडून पूर्तता करुन घ्‍यावी.

(फ) मंचाकरिताचे दोन संच व विरुध्‍द पक्षकारास देणेचे तक्रार अर्जाचे संच यांना समान अखंडित पृष्‍ठ क्रमांक दिले गेलेले असावेत.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top