What is Zero FIR? Zero FIR म्हणजे काय?

What is Zero FIR
What is Zero FIR
What is Zero FIR

What is Zero FIR, Zero FIR म्हणजे काय? –

एखाद्या गुन्ह्या बद्दल FIR हा घटना स्थळापासून लाभ नोंदवण्याची गरज पडते  तेव्हा पोलीस ठाण्यात FIR नोंदविला जातो तेव्हा त्याला Zero FIR म्हणतात.

त्यात घटनेचे कलम नोंदले जात नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेनुसार एखादा गुन्हा झाल्यास, घटनेची FIR कोणत्याही जिल्ह्यात दाखल केली जाऊ शकते.

सर्वप्रथम आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की कोणत्या प्रकारचे गुन्हा हा कसा नोंदविला गेला जातो.  दोन प्रकारे गुन्हे हे नोंदविले जातात एक आज तो अदखलपात्र गुन्हा (Non Cognizable Offence) व दुसरा दखलपात्र  गुन्हा (Cognizable Offence)

अदखलपात्र गुन्हा (Non Cognizable Offence)-

अदखलपात्र गुन्हे हे किरकोळ गुन्हे आहेत उदा. छोट्या छोट्या प्राणघातक हल्ल्याची घटना अदखलपात्र गुन्हे आहेत. 

अशा प्रकरणात थेट FIR दाखल करता येणार नाही, त्याऐवजी तक्रार दंडाधिकार्यांना दिली जाते आणि दंडाधिकारी या प्रकरणातील आरोपांना समन्स बजावू शकतात.  मग खटला सुरू होतो. म्हणजेच अशा गुन्ह्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत खटला दाखल करता येत नाही.

हे वाचले का?  Ambulance चालक करत असलेली लुट आता थांबणार | Ambulance Rate Chart |

दखलपात्र  गुन्हा (Cognizable Offence)

दखलपात्र  गुन्हा या मध्ये, जे गंभीर प्रकारचे गुन्हा आहे.  अशा प्रकरणात गोळीबार, खून आणि बलात्कार इत्यादी घटनांमध्ये थेट FIR नोंदविला जातो.  CRPC कलम 154 अन्वये पोलीसांनी दखलपात्र  गुन्हा प्रकरणात थेट FIR नोंदवणे आवश्यक आहे.

ज्या वेळेस तक्रार अशा प्रकारे गंभीर गुन्ह्यांमध्ये FIR नोंदणीसाठी सदर पोलीस स्टेशन मधील अधिकारी हे तक्रार नोंदवण्यासाठी टाळाटाळ करू शकत नाही किंवा हद्दीचे कारण देऊ शकत नाही.

What is Zero FIR in Marathi, Zero FIR म्हणजे-

जेव्हा एखाद्या गुन्हेगारी स्थळांच्या/ ठिकाणांच्या बाहेरील पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा (Cognizable Offence)  गुन्हा दाखल केला जातो तेव्हा त्याला झिरो FIR म्हणतात. त्यात घटनेची गुन्हा कलमे नोंदवले जाण नाही.

आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेनुसार एखाद्या दखलपात्र गुन्ह्या संदर्भात कोणत्याही जिल्ह्यात FIR नोंदविला जाऊ शकतो.

ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी खटला नोंदविला गेलेला नसल्यामुळे त्याचा क्रमांक त्वरित दिला जात नाही, परंतु ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते, तेव्हा FIR क्रमांक नोंदविला जातो.

हे वाचले का?  consumer protection act ग्राहक संरक्षण कायदा- तक्रार कोण दाखल करू शकते..? ग्राहक कोणास म्हणावे....?

Zero FIR मागाचा विचार असा होता की कोणत्याही पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंदवता यावा. तक्रार नोंदणी करून केसचा तपास सुरू करता यावा  आणि तक्रार नोंदवली गेल्यामुळे पुरावे नष्ट करण्यावरही आळा घालता यावा.

Zero FIR चा वापर कधी करावा: खून, बलात्कार आणि अपघात यासारखे गुन्हे कोठेही घडू शकतात अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करण्याची मागणी होत असते, परंतु FIR शिवाय कायद्याला एक पाऊलही पुढे जाता येत नाही.

अशा प्रसंगी, केवळ काही प्रत्यक्षदर्शी आणि संबंधित माहितीसह, आपण त्यास जवळच्या पोलीस स्टेशनाला कळवू शकता व Zero FIR नोंदऊ शकतो.   लिखित स्वाक्षरी करताना लक्षात ठेवा की FIR प्रतीवर सही करून एक प्रत आपल्याकडे ठेवण्यास विसरू नका.

FIR नोंदवून कायदेशीर प्रक्रिया पुढे नेण्याची सर्व पोलीसांची जबाबदारी आहे हे आपल्याला माहित असले पाहिजे, म्हणून कोणताही पोलिस “ FIR आमच्या हदीच्या बाहेर आहे” असे सांगून FIR लिहिण्यास नकार देऊ शकत नाही.

Zero FIR कशी नोंदवावी-

सामान्य FIR प्रमाणे Zero FIR देखील लेखी किंवा तोंडी असू शकतो. आपण इच्छित असल्यास पोलीस कर्मचार्‍यांना अहवाल वाचण्याची विनंती देखील करू शकता. नोंद घ्या की FIR लिहल्यानंतर पोलीसांनी उशीर न करता या प्रकरणाचा तपास सुरू केला पाहिजे.

हे वाचले का?  NA PERMISSION असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची!

लक्षात ठेवा की आपण विषम परिस्थितीत दर्शविलेली जागरूकता आणि सतर्कता आपल्याला Negative Situation परिस्थितीतून बाहेर काढू शकते. म्हणून आपणा सर्वांना सुरक्षित रहावे, जागरूक व्हावे व लोकांना जागरूक करावे ही विनंती.

लक्षात ठेवा की आपण दाखविलेली जागरूकता आपल्याला एक विकसित समाज निर्माण करण्यास खूप मदत करते.

हे ही वाचा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Zero FIR

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top