consumer protection act ग्राहक संरक्षण कायदा- तक्रार कोण दाखल करू शकते..? ग्राहक कोणास म्हणावे….?

तक्रार कोण दाखल करू शकते ?

ग्राहक संरक्षण अधिनियमान्वये खालील संवर्गातील व्यक्त तक्रार दाखल करू शकतात.

१) व्यक्तीश: ग्राहक.

२) संस्था नोंदणी अधिनियम १८६० किंवा कंपनी अधिनियम १९५६ किंवा त्या त्या काळापूरत्या अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये नोंदणी करण्यात आलेली कोणतीही ग्राहक स्वेच्छा संघटना.

३) केंद्र सरकार

४) राज्य शासने किंवा संघराज्य क्षेत्र प्रशासने

५) एकाच ग्राहकांला अधिक ग्राहकांच्या वतीने एकाच कारणासाठी तक्रार करण्यात येते. तक्रारीत काय काय येईल अधिनियमानुसार तक्रार म्हणजे तक्रार कर्त्याने एक किंवा अधिक बाबीसंबंधी केलेले कोणतेही लेखी आरोप.

१) कोणत्याही व्यापार्‍याने अनुसरलेल्या कोणत्याही अनुचित व्यापारी प्रथेमुळे ग्राहकांचे झालेले नुकसान.

२) तक्रारीत उल्लेखिलेल्या वस्तूत असलेल्या एक किंवा अनेक दोष.

३) तक्रारीत उल्लेखिलेल्या सेवामधे कोणत्याही बाबतीत आढळलेल्या उणिवा.

४) तक्रारीत उल्लेखलेल्या वस्तूसाठी व्यापार्‍याने निर्देशित किंमतीपेक्षा आकारलेली अधिक किंमत.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅन

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top