Credit Debit Card सध्याच्या काळात ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरकार ऑनलाइन व्यवहाराला प्रोत्साहन देत असते.
हे आर्थिक व्यवहार सुरक्षित कसे व्हावेत यासाठी सरकार वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेत असते.
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच प्रिपेड कार्ड संदर्भात आरबीआय ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेत असते. 1 ऑक्टोबर पासून नियमांमध्ये बदल केला आहे.
ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार कार्ड निवडता येणे शक्य होणार आहे. ग्राहक आतापर्यंत हव्या असलेल्या नेटवर्क साठी मोबाइल नंबर portability सुविधा वापरत होते.
परंतु आता अशीच सुविधा बँकांचे कार्ड घेताना मिळणार आहे.
Credit Debit Card नेटवर्क कार्ड काय असते?
सध्या तुम्ही जे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड वापरत आहात त्यावर व्हिजा, अमेरिकन एक्सप्रेस, डायनर्स क्लब, रुपे अशी नावे दिसतात. ही नवे जे नेटवर्क सुविधा पुरवतात त्यांची असतात.
ग्राहकांना सेवा सुविधा देण्यासाठी बँकेने नेटवर्क सोबत करार केलेला असतो. यामुळेच आपल्याला कार्ड वापरून व्यवहार करणे शक्य होते.
Credit Debit Card या आहेत आरबीआय च्या सूचना:
1. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड निवडता आले पाहिजे. ग्राहकांना कार्ड निवडण्याची संधी दिली पाहिजे.
2. बँक, बिगरबँक तसेच वित्तीय संस्थानी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्रिपेड कार्ड अगोदरच एखाद्या कार्ड नेटवर्क सोबत जारी करू नये.
3. ग्राहकांना कार्ड घेण्या अगोदर कोणत्या नेटवर्क चे क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्ड हवे, हे बँकेने विचारायला पाहिजे.
जुन्या कार्डवर सुविधा मिळणार?
तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक डेबिट अथवा क्रेडिट कार्ड वर त्या कार्डची मुदत दिलेली असते. हा कालावधी एक दोन किंवा पाच वर्षांचा असू शकतो.
ज्यावेळी तुमच्या कार्डची वैधता संपेल आणि तुम्ही तुमचे कार्ड रीन्यू कराल त्यावेळी तुम्हाला नेटवर्क बदलण्याचा पर्याय दिल जाईल.
जे ग्राहक नवीन बँक खाते उघडतील त्या ग्राहकांना खाते उघडताना नेटवर्क निवडता येईल.
असा मिळणार ग्राहकांना फायदा:
डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड द्वारे ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा, ऑफर्स मिळतात. काहींचे शुल्क कमी असते तर काहींचे जास्त असते. त्याचप्रमाणे ग्राहकांना वेगवेगळे रिवार्ड पण मिळतात. ग्राहकांना आपली गरज आणि वापर यांचा विचार करून नेटवर्क निवडता येईल व त्यानुसार सुविधा घेता येतील.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.