Crop Insurance महाराष्ट्रात सद्या गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल तर नुकसान झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे.
नाहीतर भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहू शकतात.
Crop Insurance अशी नोंदवा ऑनलाइन तक्रार:
- play store वर जाऊन Crop Insurance नावाचे app डाउनलोड करावे. app चालू केल्यानंतर ‘नोंदणी खात्याशिवाय खाते सुरू ठेवा’ हा पर्याय निवडावा.
- त्यानंतर आलेल्या पर्यायांमधून ‘पीक नुकसान’ या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला ‘पीक नुकसान सद्यस्थिती’ आणि ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ असे पर्याय दिसतील. यामधील ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ हा पर्याय निवडावा.
- त्यानंतर मोबाइल नंबर सह आवश्यक ती माहिती भरा.
- ‘नोंदणीचा स्त्रोत’ या कॉलम मध्ये विम्याचा फॉर्म कुठून भरला याची माहिती भरणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला विम्याची संपूर्ण माहिती दिसेल. यानंतर तुमच्या कोणत्या पिकाचे नुकसान झाले ती माहिती भरा.
- माहितीमध्ये घटनेचा प्रकार कोणता, तारीख, वेळ, पीक वाढीचा टप्पा, किती प्रमाणात नुकसान झाले याची टक्केवारी, इत्यादि माहिती भरा.
- याबरोबर च टक्के नुकसान झाले आहे याची माहिती गावातील तलाठी ला देणे आवश्यक आहे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.