विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ : :
(अ) डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्याने विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेला शुल्क अदा केल्याचे पुरावे सारथी सस्थेस सादर करणे आवश्यक राहील.
(आ) संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शुल्क तसेच, भोजन शुल्काची सत्रनिहाय रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यास पात्र असतील.
(इ) जे विद्यार्थी वसतिगृहात जागेअभावी अन्यत्र राहात असतील अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क व भोजन शुल्काची रक्कम ही तो शिक्षण घेत असलेल्या संबंधित संस्थेच्या आकारणी करण्यात येत असलेल्या वसतिगृह शुल्क व भोजन शुल्क) रक्कमेच्या मर्यादेत सत्रनिहाय रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यास पात्र असतील.
योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी र २५,०००/- व शैक्षणिक साहित्य तसेच इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण ₹ २५,000/- अशी एकूण ₹ ५०,०००/- प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर दोन टप्प्यात अदा करण्यात येईल. यासाठीचा तपशिल संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत विहित नमुन्यात सारथी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक असेल.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- SARTHI Pune विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!
- Swadhar Yojana उच्च शिक्षणासाठी ‘स्वाधार’ चा आधार | जाणून घेऊया काय आहे योजना |
- Foreign Scholarship Scheme परदेशी शिक्षणाची संधी मिळवून देणारी शिष्यवृत्ती योजना | जाणून घेऊया काय आहे योजना |
- Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज
- Education Loan Repayment ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना…..
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना विविध वेबसाईट मिळणारे लाभ
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.