Gharkul Yojana घरकुल साठी मिळणार 1 लाख रुपये अनुदान | अर्ज सुरू | पहा आवश्यक कागदपत्रे , अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती

Gharkul Yojana

Gharkul Yojana केंद्र सरकार व राज्य सरकार नागरिकांसाठी विविध योजना राबवित असतात. राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी रमाई, शबरी, आदिम, पीएम आवास यांसारख्या घरकुल योजना राबवल्या जातात.

ज्या इच्छुक लाभार्थ्याना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी 10 जुलै पर्यंत अर्ज करावा.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

नागरिकांसाठी शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील तसेच इतर मागास वर्गातील लोकाना अर्थसाहाय्य दिले जाते. नवीन घर बांधण्यासाठी किंवा कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी 1 लाख 20 हजार आर्थिक सहाय्य दिले जाते.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर योजना या विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी राबवण्यात येतात. लाभार्थीना किमान 269 चौ. फुट इतके क्षेत्रफळ बांधकाम करणे आवश्यक आहे.

Gharkul Yojana आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा

हे वाचले का?  Crop Insurance अशी मिळवा शेताच्या नुकसानीची भरपाई |

मालमत्ता नोंदपत्र

नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचयात प्रमाणपत्र

सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातींच्या प्रमाणपत्राची प्रत

आधारकार्ड

रेशनकार्ड

निवडणूक ओळखपत्र

वीज बिल

मनरेगा जॉब कार्ड

बँक पासबुकची झेरॉक्स

ग्रामपंचायतीस बंधनकारक खर्च | Grampanchayat Bandhankarak Kharch

Gharkul Yojana जागेसाठी मिळणार अनुदान:

इतर मागास प्रवर्गातील ज्या लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घ्यायचा परंतु घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशा नागरिकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य 500 चौ. फुट जागेपर्यंत 50 हजारापर्यंत अनुदान देण्यात येईल. इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.

प्रक्रिया :

ग्रामसभेने घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा,परितक्त्या महिला, कुटुंब प्रमुख,पूरग्रस्त क्षेत्रातील लाभार्थी अथवा पीडित लाभार्थी, जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान, तोडफोड झालेली व्यक्ती, नैसर्गिक आपत्तिबाधित व्यक्ति, दिव्यांग व्यक्ती उद्दिष्टांच्या किमान 5 टक्के उद्दिष्ट दिव्यांगांकरिता राखीव ठेवणे आवश्यक आहे.

हे वाचले का?  मोदी सरकारची महिलांसाठी नवी योजना | scheme for women |महिला बचत गटांना मिळणार ड्रोन |

घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृह निर्माण कार्यालयाकडून ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर निधी लाभार्थीच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल. त्या व्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 12 हजार अनुदान शौचालय बांधकामासाठी लाभार्थींना पात्र मिळेल.

मिळणार एवढी रक्कम :

डोंगराळ, दुर्गम भाग क्षेत्रामध्ये बांधकांमासाठी प्रति घरकुल 1 लाख 30 हजार

सर्व साधारण क्षेत्राकरिता प्रति घरकुल 1 लाख 20 हजार

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top