How to Reduce Loan Burden नवीन वर्ष सुरू झाले की अनेकजण नवनवीन संकल्प करत असतात. संकल्प पूर्ण करण्यासाठी अनेकांनी काम चालू केले असेल.
परंतु जर आर्थिक समस्यांचा सामना करायचा नसेल तर आपल्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
आर्थिक समस्या निर्माण झाल्यास कोणासमोर हात पसरावे लागू नये यासाठी कर्ज आणि उत्पन्नाच्या प्रमाणाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायला हवा.
यामुळे तुम्ही कर्ज मुक्त राहण्यास मदत होईल तसेच आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत राहील.
डिटीआय(कर्ज आणि उत्पन्न प्रमाण) फॉर्म्युला उपयुक्त कसा?
तुमचे मासिक कर्ज आणि उत्पन्न याचे गुणोत्तर म्हणजेच डिटीआय फॉर्म्युला.
यासाठी तुमच्या कर्जाच्या मासिक हप्त्याच्या रकमेस तुमच्या उत्पन्नाच्या रकमेने भागावे.
यातून तुम्हाला समजेल क्ी तुमच्या कर्जाच्या हप्त्यावर तुमच्या उत्पन्नातून किती रक्कम खर्च होते.
How to Reduce Loan Burden अल्प मुदतीच्या कर्ज फेडीला प्राधान्य द्यावे.
कर्जाचा भार अतिरिक्त वाटू नये यासाठी प्रथम 3 वर्ष मुदतीच्या कर्जाला प्राधान्य द्यावे. त्यानंतर दीर्घकालीन कर्जावर लक्ष द्यावे.
How to Reduce Loan Burden संकट टाळण्यासाठी काय करावे?
बोनस किंवा वाढीव वेतनाचा वापर: वाढीव वेतनातून किंवा बोनस मिळालेल्या रकमेतून अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड करा. इतर कामांसाठी कर्ज परतफेडी साठीची रक्कम वापरू नका.
कर्जाचे एकत्रीकरण करा: शक्य असेल तर जास्त व्याज दराची अनेक कर्ज एकत्र करून त्याचे रूपांतरण एकाच कर्जत करून घ्या. यामुळे कर्जाची परतफेड करणे सोपे होते. तसेच व्याजावरील खर्च ही कमी होईल.
बॅलन्स ट्रान्सफर क्रेडिट कार्ड: जास्त व्याजदर असलेले कर्ज कमी व्याजदर असलेल्या क्रेडिट कार्ड वर ट्रान्सफर करून घ्या. काही क्रेडिट कार्ड वर ग्राहकांना सुविधा दिली जाते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.