Shet Rasta जमिनीची विभागणी झाली की त्या शेत जमिनी कडे जाण्यासाठी शेत रस्त्याची आवश्यकता असते. जसे जमिनीची विभागणी वाढत चालली आहे तसे शेत रस्त्याची मागणी देखील वाढत चालली आहे.
जर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेताकडे जाण्यासाठी शेतरस्ता नसेल, तर त्यासाठी नवीन शेतरस्ता अर्ज कसा करायचा, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे, अर्ज केल्यानंतर प्रक्रिया कशी असते याबाबत ची माहिती या लेखात आहे.
लेख पूर्ण वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा
Shet Rasta मागणी अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार जर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ता नसेल तर नवीन शेत रस्त्यासाठी तो शेतकरी अर्ज करू शकतो.
शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला नवीन शेतरस्ता दिल जातो.
नवीन शेतरस्ता हवा असल्यास शेतकऱ्याला तहसीलदाराकडे लेखी अर्ज करावा लागतो.
अर्जामध्ये शेतकऱ्याला त्याचे नाव, गावाचे नाव, गट क्रमांक, क्षेत्र किती आहे त्याबद्दल ची माहिती, शेता शेजारी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांची नावे व पत्ता इ. माहिती देणे आवश्यक आहे.
तुम्हाला शेतरस्ता मागणी अर्ज करण्याचे कारण अर्जामध्ये नमूद करावे.
अर्जासोबत शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. त्यामध्ये
- अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीचा व ज्या शेतजमिनीच्या बांधावरून रस्ता अर्ज केला अशा जमिनीचा कच्चा नकाशा
- अर्जदार शेतकऱ्याचा मागील तीन महिन्याचा सातबारा
- शेतजमिनी लगत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्यांची नावे, पत्ता व त्यांच्या जमिनीची माहिती
- जर अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीचा कोर्टामध्ये वाद असेल, तर त्याबाबतची कागदपत्रे
शेतकऱ्याने अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदार व त्याच्या जमिनी लगत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, अशा सर्वांना नोटीस दिली जाते व त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येते.
अर्ज केलेल्या शेतकऱ्याला खरंच शेतरस्त्याची आवश्यकता आहे की नाही याची तहसीलदारांकडून पाहणी करण्यात येते व आणि त्यानंतर तहसीलदार रस्ता मागणी अर्जावर निर्णय देतात.
रस्ता मागणी अर्ज हाा स्वीकारला जातो किंवा फेटाळला जातो. अर्ज मान्य झाला तर शेजारच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल, या गोष्टीकडे लक्ष दिले जाते.
साधारणपणे एक बैलगाडी जाऊ शकेल म्हणजेच जवळपास 8 फुट रूंद रस्ता मागणी केलेल्या शेतकऱ्याला दिल जातो.
जर शेतकऱ्याला तहसीलदारांचा निर्णय मान्य नसेल तर निर्णय दिल्यापासून 60 दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अपील दाखल करता
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा