Crop Loan Restructuring पीक कर्ज पुणर्गठण म्हणजे काय?

Crop Loan Restructuring

Crop Loan Restructuring राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकार ने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाचे पुणर्गठण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला आहे. 30 एप्रिल 2024 पर्यंत कर्ज पुणर्गठण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना पुढच्या हंगामासाठी नवीन कर्ज वाटप करण्यात येणार आहे. याबाबत बँकांना सूचना देखील देण्यात आल्या आहे.

Crop Loan Restructuring पीक कर्ज पुणर्गठण म्हणजे काय?

शासनाकडून शेतकऱ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांकडून पिकाच्या उत्पन्नामधून केली जाते. शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणारे कर्ज हे बिनव्याजी किंवा कमी व्याज दाराचे असते. या कर्जावरील बोजा हा सरकारकडून उचलला जातो. त्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. परंतु काही शेतकऱ्यांना या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही.

जर पुर, दुष्काळ, अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली तर निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍याने पिकवलेल्या पिकांना याचा फटका बसतो व त्यातून अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळते. परंतु काही वेळा अशी परिस्थिती येते की शेतकऱ्याच्या हातात काहीच उत्पन्न मिळत नाही.

हे वाचले का?  PM Crop Insurance एक रुपया पिक विमा योजनेसाठी पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित | कापसासाठी मिळणार 52,000 रु. तर सोयाबीनसाठी मिळणार 55,000 रु. चे विमा कवच |

अशा वेळी त्या शेतकर्‍याकडे पुढचे पीक उभे करण्यासाठी पैसा उपलब्ध नसतो. शेतकर्‍याकडे आधीच कर्ज असते आणि त्यात पिकाचे उत्पन्न पण नाही. अशावेळी पीक कर्जाची वसूली ही केली जात नाही. शेतकऱ्याला जुने कर्ज थकले असल्या कारणाने नवीन कर्ज घेताना अडचण येऊ नये यासाठी अल्पमुदत कर्ज, मध्यम किंवा दीर्घ मुदतीच्या कर्जात रूपांतरित केले जाते. शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करण्यास काही ठराविक हप्त्याची मुदतवाढ दिली जाते. यालाच कर्जाचे पुणर्गठण म्हटले जाते.

कर्जाचे पुणर्गठण म्हणजेच कर्जमाफी नसून ती एक अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी आणि नवे कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे.

प्रक्रिया:

शेतकऱ्यांकडून थकलेल्या कर्जाचे पुणर्गठण करताना कर्जाचे किती हप्ते पाडले जाणार, कर्जाची परतफेड कशी केली जाणार हे बँक शेतकऱ्यांना सांगत असते. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या निर्देशानुसारच कर्ज देणारी बँक कर्जाचे हप्ते पाडून देते.

हे वाचले का?  Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजना हप्ता होणार लवकरच जमा |

रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा रकमेनुसार वेगवेगळ्या असतो. कर्जाचे पूनर्गठण केले तर शेतकऱ्यावर आधीचे कर्ज व नवीन घेतलेले कर्ज एकाच वेळी फेडावे लागल्यामुळे शेतकर्‍यावर बोजा येणेची शक्यता असते. बँकेकडून ठरवल्यावर जाणाऱ्या हप्त्यावर या गोष्टी अवलंबून असतात.

थकीत हप्त्यांसाठी जास्त व्याज:

कर्जाचे पुणर्गठण केल्यानंतर शेतकऱ्यांना थकीत असलेल्या कर्जाची समान हप्त्यामध्ये विभागणी करून ते कर्ज परतफेड करण्याची परवानगी जाते. यावेळी दिलेल्या मुदत वाढीमध्ये शेतकऱ्याकडून अतिरिक्त व्याज आकारले जाते नाही.

परंतु जर् शेतकऱ्याने पुणर्गठण केलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाही तर त्या कर्जावरील व्याजावर मिळणारी सूट शेतकऱ्याला मिळू शकत नाही. अशावेळी शेतकऱ्याला अडचणीचा सामना करावा लागतो आणि कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यामुळे शेतकर्‍यावरील कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता असते.

हे वाचले का?  Tukade bandi kayda Update 2023 महाराष्ट्र नोंदणी कायदा दुरुस्ती अधिनियम 2023

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा             

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top