ITR २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख आहे. अंतिम तारीख जशी जवळ येते तसे सायबर फसवणुकीचे प्रमाण देखील वाढू लागते. कर भरणाऱ्या करदात्याची छोटी चूक सुद्धा त्यांना महाग पडू शकते.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
बँक खात्याची तसेच इतर खासगी माहिती चोरून हल्लेखोर कर दात्याची फसवणूक करू शकतात. यामुळे ITR फाइल करताना कर भरणाऱ्या व्यक्तीने सावध आणि सजग राहायला हवे.
यासाठी करदात्याने कोणती काळजी घ्यावी याची माहिती आपण बघणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.
ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी म्हणजे काय? फायदे जाणून घ्या E-Shram Card ऑनलाईन असे काढा.
ITR रिटर्न फाइल करताना ही काळजी घ्या:
व्यक्तिगत माहिती सुरक्षित ठेवावी: रिटर्न फाइल करताना आपली वैयक्तिक माहिती थर्ड पार्टी ला देणे टाळावे. नेहमी ई-फायलींग चा पर्याय निवडावा.
पासवर्ड मजबूत निवडावा: तुमचा लॉग इन पासवर्ड नेहमी बदलत रहा. पासवर्ड बनवताना त्यात अंक, अक्षरे, चिन्ह यांचा वापर करावा. तुमची लॉग इन आयडेंटिटी वैशिष्ट्यपूर्ण ठेवा.
हे हल्ले होऊ शकतात: फिशिंग हल्ला, मालवेअर अटॅक त्याचप्रमाणे आयडेंटिटी थेट अशा प्रकारचे सायबर हल्ले होऊ शकतात.
पब्लिक वाय-फाय चा वापर करणे टाळा: ज्यावेळी करदात्याला आयटीआर भरायचं असेल, त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या वायफाय चा वापर करणे टाळावे. टू फॅक्टर ऑथेंटीफिकेशन सतत ऑन ठेवावे.
सॉफ्टवेअर नेहमी अपडेट करा: करदात्याने वापरत असलेल्या गॅजेट्स मध्ये अपडेटेड अँटीव्हायरस सॉफ्टवेअर टाकून ठेवणे आवश्यक आहे. ऑपरेटिंग सिस्टीम सह इतर सॉफ्टवेअर नेहमी अपडेट करावे.
ई-मेल काळजीपूर्वक वाचावे: आयटीआय भरताना आयकर अधिकारी, टॅक्स सल्लागार, सीए असल्याचा बनाव करून ई-मेल पाठवले जातात. अशा प्रकारचे ईमेल हे काळजीपूर्वक वाचावे व आलेल्या मेल मधील संदिग्ध लिंक वर क्लिक करू नये.
अद्ययावत सेवा वापरावी: टोकनायझेशन सारख्या संरक्षण प्रणालीचा वापर करदात्यांनी आपला डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी करावा. त्यामुळे आर्थिक माहिती किंवा वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. तुमच्या करासंबंधीची कागदपत्रे चुकीच्या हातामध्ये पडत नाही.
बँक खात्यावर देखरेख ठेवा: तुमच्या खात्यामधील व्यवहारांवर नजर ठेवावी. जर तुम्हाला काही संशयास्पद व्यवहार आढळला तर तात्काळ तुमच्या बँकेला कळवावे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.