Women Schemes व्यवसायासाठी महिलांना मिळणार 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज |

Women Schemes

Women Schemes महिला उद्योजकांना भांडवल उपलब्ध व्हावे, म्हणून केंद्र सरकार कडून महिलांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. व्यवसाय करण्यासाठी महिलांना भांडवल उपलब्ध व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारकडून उद्योगिनी योजना राबविली जाते.

उद्योगिनी योजना काय आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, किती कर्ज मिळू शकते, याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहे. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Women Schemes काय आहे उद्योगिनी योजना:

उद्योगिनी योजना ही बँकांच्या माध्यमातून राबविली जात आहे या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज विनातारण म्हणजेच काहीही गहाण न ठेवता मिळते, तर काही महिलांना कर्ज उपलब्ध होते.

हे वाचले का?  लोकशाही दिन कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..!

वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला स्वावलंबी, आर्थिक दृष्ट्या सक्षम बनाव्या, यासाठी उद्योगिनी योजना लाभदायक ठरत आहे. तसेच महिला स्वतःच्या पायावर उभे राहून घराला या योजनेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावू शकतात.

कोणत्या कामासाठी कर्ज मिळते?

उद्योगिनी योजनेअंतर्गत खालील व्यवसायासाठी कर्ज मिळू शकते
बुक बाईंडिंग
बेडशीट आणि टॉवेल बनविणे
ब्युटी पार्लर
नोटबुक बनविणे
बांगड्या बनविणे
चहा आणि कॉफी बनविणे
रोपवाटिका
कापूस धागा उत्पादन
दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री संबंधित व्यवसाय
ड्रायक्लिनिंग लॅब व्यवसाय
सुक्या मासळीचा व्यापार
डायग्नोस्टिक लॅब व्यवसाय
नायलॉन बटन उत्पादन
खाद्यतेलाचे दुकान
पापड निर्मिती
जुने पेपर मार्ट

CAA: Citizenship Amendment Act म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा काय आहे?

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीचे रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जन्म दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबूक
  • जात प्रमाणपत्र
हे वाचले का?  Schemes For Women 2024 Budget या आहेत अर्थसंकल्पातील महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा |

हे आहेत योजनेचे निकष:

अर्ज करू इच्छिणारी व्यक्ती ही महिला असावी.
वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपर्यंत असावे.
व्यवसाय कर्जासाठी फक्त महिला व्यवसाय मालक होण्यास पात्र आहेत.
पात्र महिला 18 ते 55 वर्षे वयोगटातील असावी.

या राष्ट्रीय बँकांमध्ये करता येतो अर्ज:

काही राष्ट्रीय व खाजगी बँकांमार्फत उद्योगिनी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

त्यासाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना अर्ज करावा लागतो. बँकेकडून अर्जाची पडताळणी केली जाते व त्यानंतर कर्ज दिले जाते.

कमी व्याजात कर्ज:

अनेक बँका महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी अनेक पावले टाकत आहेत. उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना तीन लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

यामध्ये अनुसूचित जाती जमाती तसेच विकलांग असलेल्या महिलांना बिनव्याजी कर्ज मिळते.

हे वाचले का?  शेळी पालन अनुदान (Shelipalan Anudan) 2021 मध्ये घसघशीत वाढ

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top