Kisan Credit Card(KCC) शेतकऱ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सरकार नवनवीन योजना राबवते.
शेतकऱ्यांना शेती संबंधित असलेल्या कामांसाठी लागणारी आर्थिक मदत करणे हा किसान क्रेडिट कार्ड चा मुख्य उद्देश्य आहे.
बियाणे, खाते, किटकनाशके, यासाठी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज दिले जाते.
सर्व शेतकरी किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकतात. स्वत:च्या मालकीची जमीन असणारे शेतकरी तसेच भाडे तत्वावर इतरांची जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. जे शेतकरी पशु पालन तसेच मत्स्य पालन करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेत येतो.
Kisan Credit Card असा करा अर्ज:
येथे पहा किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत किती कर्ज मिळेल?
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना KCC योजनेचा लाभ घेत यावा यासाठी सरकारने किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्याचे ठरवले.
किसान क्रेडिट कार्डचा अर्ज हा पीएम किसान योजनेच्या वेबसाइट वरच उपलब्ध आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा आज डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
फॉर्म डाउनलोड करून आवश्यक ती माहिती भरवायची आहे. अर्ज भरून त्यासोबत सातबारा उतारा व 8-अ उतारा दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याच शपथपत्र, आधार कार्ड, पण कार्ड पासपोर्ट साइज फोटो ही कागदपत्रे घेऊन बँकेत जमा करायची आहेत.
येथे पहा किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत किती कर्ज मिळेल?
तुम्ही अर्ज आणि कागदपत्रे बँकेत जमा केल्यानंतर नंतरच्या 2 आठवड्यात बँकेने तुम्ही दिलेल्या पत्त्यावर कार्ड पाठवायला हवे, असे सरकारने सांगितलेले आहे.
ही प्रक्रिया पूर्णपणे नि:शुल्क आहे. 3 लाख रूपयांपर्यंतच्या कर्ज प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेले आहे.
याची वैधता 5 वर्षांची असली तरी पण शेतकर्याला कार्ड रिन्यू करणे आवश्यक आहे.
जर एखाद्या शेतकऱ्याने पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेतला नसेल् तर, तुम्हाला बँकेत जाऊन सांगेह आहे की तुम्ही किसान सन्मान योजनेचे लाभार्थी नाहीय.
बँकेकडून तुम्हाला इंडियन बँक असोसिएशन ने कृषी कर्जासाठी बनवलेला अर्ज दिला जाईल.
तो फॉर्म भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बँकेत जमा करू शकता.
KCC फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. आपल्या जवळील CSC सेंटर मध्ये जाऊन शेतकरी अर्ज करू शकतात.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा