शेतक-यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी व शेतातील माल वाहतूक करण्यासाठी अतिक्रमण मुक्त रस्ते अत्यावश्यक आहेत. त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे शेतरस्ते गाडीरस्ते मोकळे होणार शेतावर जाण्याचे पायमार्ग गाव नकाशाप्रमाणे शिवाररस्ते अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद / पांधण लोकसहभागाद्वारे मोकळे करणे.
सात बारा दुरूस्ती व प्रलंबित फेरफार निपटारा महाराजस्व अभियान सुरू महसूल विभाग विशेष मोहीम भाग -१
पोटखराबा वर्ग अ खालील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी विशेष मोहिम राबविणे, गाव तिथे स्मशानभूमी / दफनभूमी उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व जिल्हयात विशेष मोहीम राबविण्यात यावी याकरिता पुढीलप्रमाणे कार्यपध्दती अनुसरण्यात यावी.
• सर्व प्रथम संबंधित तलाठी यांचेमार्फत गावातील एकूण पाणंद/पांधण/शेत रस्ते/शिवार रस्ते/गाडी रस्ते शेतावर जाण्याचे पायमार्ग व शिव रस्ते अशा रस्त्यांबाबत माहिती संकलित करण्यात यावी. त्यापैकी अतिक्रमित व बंद झालेल्या रस्त्यांची माहिती संकलित करावी व ही सर्व माहिती Geo tag करुन Soft व Digital स्वरुपात साठवावी.
• वरीलप्रमाणे रस्त्यांची संकलित केलेली माहिती सर्व गावक-यांना मिळावी याकरिता सदर रस्त्यांची माहिती ग्रामपंचायत / चावडीमध्ये गाव नकाशात दर्शवून तेथे दर्शनी भागात लावण्यात यावी. तसेच ही सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी.
• त्यानंतर सर्वप्रथम अतिक्रमित व बंद झालेले रस्ते लोक सहभागातून मोकळे करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
• त्यानंतर अतिक्रमणामुळे बंद झालेले उर्वरित रस्ते मोकळे करून देण्यास स्वत:हून शेतकरी पुढे येणार नसल्यास व अपेक्षित लोकसहभाग प्रयत्न करुनही न मिळाल्यास अतिक्रमित व बंद झालेले रस्ते मोकळे करण्याबाबत उपलब्ध कायदेशीर तरतुदीचा आधार घेऊन रस्ते मोकळे करण्याची पुढील कार्यवाही करण्यात यावी.
• शेतकऱ्यांकडून मागणी आल्यास व शेतबांधाच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांची संमती असल्यास नवीन शेतरस्ते तयार करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
• पोटखराबा वर्ग-अ खालील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी.
• गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी.
वरीलप्रमाणे या मोहिमेअंतर्गत अतिक्रमणमुक्त झालेले साधारणत: ६ फूट किंवा त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते अथवा संमतीने नव्याने तयार केलेले रस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत किंवा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून किंवा अन्य योजनेअंतर्गत या प्रयोजनार्थ उपलब्ध होऊ शकणा-या निधीतून किंवा विविध कंपन्या / कारखाने / संस्थांच्या Corporate Social Responsibility (CSR) फंडातून विकसित करण्यात यावे.
नव नवीन माहिती
- How to Improve CIBIL Score सीबील स्कोर कसा सुधारावा?
- Agristack ॲग्रिस्टॅक योजना महाराष्ट्रात राबविण्यास मान्यता
या सर्व प्रक्रियेसाठी केलेल्या स्वतंत्र App मध्ये अतिक्रमण असतानाची म्हणजेच मोहिमेपूर्वीची रस्त्यांची स्थिती व मोहिमेनंतर अतिक्रमण काढल्यानंतर रस्त्याचे स्वरूप याची छायाचित्रे काढून संग्रहीत ठेवावीत. जेणेकरुन झालेल्या कामाचे दृश्य परिणाम लक्षात येतील. तसेच भविष्यात अतिक्रमण रोखण्यास मदत होईल.
(सदर माहिती प्रस्तुत शासन निर्णयासोबत जोडलेले प्रगती अहवाल प्रपत्र – अ-५ मध्ये संकलित करण्यात यावी.)
हे वाचले का?
- घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे सर्व कायदेशीर माहिती
- घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!!
- Home Flat Buying tips घर घेताय, या दहा गोष्टी तपासून घ्या!
- मृत्युपत्र /Death Will म्हणजे काय? चला समजून घेऊया!
- गौण खनिज (Gaun Khanij Kayda) कायदा.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे सर्व कायदेशीर माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा