Mahila Swayamsiddha Vyaj Partava Yojana महिला स्वयंसिद्धी कर्ज योजना | बघा संपूर्ण माहिती |

Mahila Swayamsiddha Vyaj Partava Yojana

Mahila Swayamsiddha Vyaj Partava Yojana राज्यातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होवून त्या सक्षम व्हाव्यात.

या हेतूने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील महिलांकरीता ” महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.

Mahila Swayamsiddha Vyaj Partava Yojana योजनेचा उद्देश्य:

१. सदर योजना राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांकरीता लागू असेल.

इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा उद्देशआहे.

महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगांकरीता बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रु.५.०० ते रु. १०.०० लक्षपर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील १२% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल.

२. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधनकेंद्र (CMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येईल.

हे वाचले का?  E Pik Pahani ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!

येथे पहा महिला स्वयंसिद्धी कर्ज योजना अटी व शर्ती

योजनेची वैशिष्ट्य:

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे महिलांसाठी महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना सुरू करण्यात आली.

महिलांसाठी सुरू केलेली खास योजना आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या साधन केंद्र च्या सहाय्याने ही योजना राबविण्यात येते.

या योजनेअंतर्गत दिल जाणारा आर्थिक लाभ रक्कम ही थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाते.

या योजनेची अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे.

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे

योजनेचे स्वरूप-

१. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या CMRC मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटात किमान ५०% इतर मागास प्रवर्गातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.

२. पात्र महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना सदर व्याज परतावा योजनेचा लाभ ओबीसी महामंडळाकडून घेता येईल.

हे वाचले का?  Birsa Munda Krushi Kranti Scheme विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा

तसेच सदर बचत गटातील उर्वरित महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून तसेच इतर शासकीय विभागाच्या / महामंडळाच्या योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

3. इतर मागास प्रवर्गातील किमान ५०% महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्प्यात रु.५.०० लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडुन उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात येईल.

येथे पहा महिला स्वयंसिद्धी कर्ज योजना अटी व शर्ती

४. प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परतफेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात रु.१०.०० लक्ष पर्यंत कर्ज बँकेकडुन मंजुर करुन घेण्यास पात्र होईल.

५. बँकेकडून मंजुर केलेल्या कर्ज रक्कमेवरील कमाल १२% व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.

६. ओबीसी महामंडळा मार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याजाचा परतावा बँकेच्या मंजूरीनुसार ५ वर्षांपर्यंतच्या कालावधीक‍रिता बँक प्रमाणिकरणानुसार अदा करण्यात येईल.

हे वाचले का?  Kanda Anudan Update कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे

७ . महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या बँका व CMRC यांचे दरम्यान करण्यात आलेल्या MOU तील निकषानुरुप १% शुल्क हे कर्ज रक्कमेवर व १% शुल्क हे परतफेड रक्कमेवर अदा केले जाते. त्या धर्तीवर सदर योजनेत बँकेने मंजूरी केलेल्या रक्कमेच्या १% प्रशासकीय शुल्क कर्ज मंजुरीनंतर व १% प्रशासकीय शुल्क रक्कम संपूर्ण मुद्दल रक्कमेच्या कर्ज परतफेडीनंतर ओबीसी महामंडळाकडून महिला आर्थिक विकास महामंडळास अदा करण्यात येईल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top