Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून मिळवा शेततळे

Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana

Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana पर्जन्यधारित शेतीसाठी पाणलोटावर आधारित जल संधारणाच्या उपाययोजनांव्दारे पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आता मागेल त्याला शेततळे देण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेततळे घेऊन पाण्याची गरज भागविता येणार आहे. आणि आपल्या जीवनमानात बदल करता येणार आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत शेततळ्यांचा समावेश 2022 मध्ये केला गेला. राज्यातील शेतकऱ्यांना संपन्न आणि लखपती करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. त्यानुसार शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यातील एक भाग म्हणून मागेल त्याला शेततळे मिळणार आहे. शेततळ्यांसाठी अनुदान वाटप करण्यात येत असलेल्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे मागील त्याला शेततळे ही संकल्पना वेगाने अंमलात आणली जात आहे.

लाभार्थी पात्रता येथे पहा

Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana अशा आहेत अटी व शर्ती

  • कृषी विभागाचे कृषी सहाय्यक/कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल.
  • कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
  • लाभार्थ्याने स्वतःच राष्ट्रीयकृत बँक/इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक/कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्स सादर करावा.
  • कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
  • शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी.
  • शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची राहील.
  • पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वतः करावी.
  • लाभार्थ्यांना७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे.
  • मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे बंधनकारक राहील.
  • इनलेट आउटलेट ची सोय असावी शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे.
हे वाचले का?  Savitribai Phule Scholarship 5वी ते 10वीच्या मुलींना मिळणार शिष्यवृत्ती | पहा संपूर्ण माहिती |

अर्ज कसा करायचा

अ. सोडतीनंतर सादर करावयाची कागदपत्रे-

१. ७/१२ उतारा (मालकी हक्कासाठी) 3. ८अ उतारा (एकुण क्षेत्राच्या माहीतीसाठी) सामाईक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने अनुदान मागणीसाठी अर्ज केला असल्यास ते क्षेत्रामध्ये सुक्ष्म सिंचन संच बसविणार आहेत, त्या क्षेत्रामध्ये सुक्ष्म सिंचन संच बसविण्यास तसेच त्यांचे नावे अनुदान वर्ग करण्यास हरकत नसल्याबाबत इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणे बंधनकारक आहे असुन ते साध्या कागदावर घेण्यात यावे. (परिशिष्ट १९)

४. लाभार्थी/ संस्था यांना शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास मालकी हक्क असेलला ७१२. ८अ आणि लामाध्यनि अर्ज मंजुर झाल्याच्या दिनांकापासून सात ते दहा वर्षासाठी शेतमालकासोबत केलेल्या कराराची प्रत

५. शेतकरी गट / सहकारी संस्था/ शेतकरी उत्पादक कंपनी / पंचायत राज संस्था यांनी अनुदान मागणीसाठी अर्ज केला असल्यास, संस्था प्रमुख गट प्रमुख या क्षेत्रामध्ये सुक्ष्म सिंचन संच बसविणार आहेत, त्या क्षेत्रामध्ये सुक्ष्म सिंचन संच बसविण्यास तसेच स्थानाचे अनुदान धर्म करण्यास हरकत नसल्याबाबत इतर सदस्यांचे सहमती पत्र.

हे वाचले का?  Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये | मुख्यमंत्री : वयोश्री योजना |

लाभार्थी पात्रता येथे पहा

ब. संच खरेदी केल्यानंतर सादर करावयाची कागदपत्रे

१. शेतक-याचे हमीपत्र (विहीत नमुना सोबत परिशिष्ट मध्ये सहमंत्रित केला आहे

२. देवाची मूळ प्रत (टैक्स इन्व्हाईस)

३. कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन संच आराखडा व प्रमाणपत्र (सहपत्रित परिशिष्ट ६ प्रमाणे)

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top