Pink Rickshaw Scheme For Women महिलांना मिळणार अनुदान | “पिंक (गुलाबी) ई-रिक्षा” योजना सुरू | GR आला | पहा पात्रता, आवश्यक कागदपत्रे |

Pink Rickshaw Scheme For Women

Pink Rickshaw Scheme For Women राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच, महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई-रिक्षा” ही योजना राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

योजनेचा उद्देश Pink Rickshaw Scheme For Women:-

१) राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.

हे वाचले का?  Best Saving Schemes या आहेत बचतीसाठी सर्वोत्तम योजना | मिळते आकर्षक व्याज |

२) त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.

३) राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.

४) राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा.

५) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.

तुमची केस लढण्या करता मोफत वकील अर्ज कसा करावा?

योजनेचे स्वरुपः-

सदर योजनेंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

१) ई-रिक्षाची किंमतीमध्ये सर्व करांच्या (GST, Registration, Road Tax, etc.) समावेश असेल.

२) नागरी सहकारी बँका/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/राष्ट्रीयकृत बँका / अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई-रिक्षा किंमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

३) राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचलेल.

हे वाचले का?  काय आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना(Abhay Yojana)

४) योजनेची लाभार्थी महिला/मुलीं यांच्यावर १० टक्के आर्थिकभार असेल.

५) कर्जाची परतफेड ५ वर्षे (६० महिने)

Pink Rickshaw Scheme For Women लाभार्थी:-

राज्यातील गरजू मुली व महिला.

लाभार्थ्यी पात्रता:-

१) लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.

२) अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे.

३) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

४) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.३.०० लाखापेक्षा जास्त नसावे.

५) लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील.

६) विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह/बालगृहातील आजी/माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल.

७) तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुध्दा प्राधान्य देण्यात येईल.

शासन निर्णय येथे पहा

Pink Rickshaw Scheme For Women आवश्यक कागदपत्रे :-

१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.,

हे वाचले का?  Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये | मुख्यमंत्री : वयोश्री योजना |

२) लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड.

३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.

४) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.३.०० लाखापेक्षा कमी.).

५) बैंक खाते पासबुक,

६) पासपोर्ट आकाराचा फोटो.

७) मतदार ओळखपत्र (१८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला).

८) रेशनकार्ड.

९) चालक परवाना (Driving License).

१०) सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र.

११) सदर योजनेच्या अटीशर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top