Savitribai Phule Scholarship 5वी ते 10वीच्या मुलींना मिळणार शिष्यवृत्ती | पहा संपूर्ण माहिती |

savitribai-phule-scholarship

Savitribai Phule Scholarship सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनी घेऊ शकतात.

Savitribai Phule Scholarship योजनेचा उद्देश :

  1. मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी,
  2. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे,
  3. शिक्षणामधील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
  4. शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व्हावे.

आवश्यक कागदपत्रे येथे पहा

योजनेची वैशिष्ट्य:

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

महाराष्ट्रातील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विजाभज / विमाप्र प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे, हा उद्देश लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे.

हे वाचले का?  Mukhyamantri Vayoshri Yojana राज्य सरकार देणार ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये | मुख्यमंत्री वयोश्री योजना |

मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे, तसेच त्यांना आत्मनिर्भर व सक्षम बनविणे, या हेतूने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना एक महत्वाची योजना आहे.

या योजनेअंतर्गत दिली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही विद्यार्थिनीच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा करण्यात येईल.

किती मिळते शिष्यवृत्ती?

योजनेच्या अटी :-

  1. विद्यार्थींनी विजाभज / विमाप्र/ इतर मागास प्रवर्गातील असावी.
  2. इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिक्षण घेणारी असावी.
  3. उत्पन्नाची अट लागू नाही.
  4. मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  Sarathi Drone Pilot Training ड्रोन पायलट साठी सारथी कडून मिळणार प्रशिक्षण | ऑनलाइन अर्ज सुरू |

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top