PM Kisan 17th Installment पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नाहीत‌..? अशी करा तक्रार | 

PM Kisan 17th Installment

PM Kisan 17th Installment पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल 18 जून रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. याअंतर्गत देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता जमा झाला आहे. एकूण 20 हजार कोटी रुपये 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले.

पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले की त्यांना त्याची माहिती एसएमएस द्वारे मिळते.

परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. केवायसी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे यांची पूर्तता केल्यानंतर सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांना याबाबतीत तक्रार करता येते.

अशी करा ऑनलाईन तक्रार 

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जमा झाला नाही. त्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवता येते. यासाठी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करता येईल

हे वाचले का?  Pik Vima 2025 खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा अर्ज सुरु, ही आहे शेवटची तारीख..!

अशी करा फोनच्या माध्यमातून तक्रार 

शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता जमा न झाल्यास हेल्पलाइन क्रमांक वरती तक्रार करता येते. यासाठी हेल्प हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 या टोल फ्री क्रमांक वर फोन करून आपली तक्रार नोंदवता येईल. त्याचप्रमाणे 011-23381092  या क्रमांकावर ही संपर्क साधून तक्रार करता येते. 

PM Kisan 17th Installment बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे असे तपासा 

सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर मुख्य पेजवरील लाभार्थी स्थिती या बटनावर क्लिक करा .

त्यानंतर बँक खाते क्रमांक आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका.

यानंतर डेटा मिळवा या बटनावर क्लिक करून लाभार्थी शेतकऱ्याला आपली माहिती पाहता येईल

हे वाचले का?  MSRTC Scheme पूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त १,१०० रुपयात….. एसटी महामंडळाची 'आवडेल तिथे प्रवास योजना'!!!

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top