buying seeds pesticides and fertilizers बियाणे, खते खरेदी करायची आहेत, फसवणूक टाळण्यासाठी ही काळजी घ्या….!!!!

गुणवत्ता व दर्जाची खात्री आवश्यक

 • गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे व खते खरेदीस प्राधान्य द्यावे.
 • पावतीसह खरेदी केल्यास बनावट व भेसळयुक्त बियाणे असण्याचा धोका टाळता येतो.
 • पावतीवर बियाण्यांचा, खतांचा संपूर्ण तपशील जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, खरेदीदाराचे पूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव नमूद असल्याची खात्री करावी.
 • खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे, खते पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
 • भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची, खतांची पाकीटे सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी. तसेच पाकीटांवरील अंतिम मुदत तपासून घ्यावी.
 • खरेदी केलेली बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी.
 • बियाण्याची निवड ही जमीन व ओलीताची साधने लक्षात घेऊन करावी.
 • कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी

 • किटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावेत.
 • किटकनाशकाला हुंगणे किंवा वास घेणे टाळावे.
 • तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा.
 • मिश्रण हाताने न ढवळता लांब दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा.
 • फवारणी करताना लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्याठिकाणापासून दूर ठेवावे.
 • किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या नष्ट कराव्यात.
 • किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्त वेळ करु नये.
 • शिल्लक राहिलेले द्रावण तयार केल्याच्या 24 तासानंतर वापरु नये.
 • कडक उन्हात किंवा जोरदार वाऱ्याच्या परिस्थितीत तसेच पाऊस पडण्यापूर्वी अथवा पाऊस पडल्यानंतर लगेच फवारणी करु नये.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top