PM Kisan Yojana Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत

PM Kisan Yojana Update

PM Kisan Yojana Update केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी दिनांक ०१ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) सुरू केली असुन सदर योजना संदर्भ क्र. २) च्या शासन निर्णयान्वये कृषी विभाग, महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने राज्यात राबविण्यात येत आहे.

सदर योजनेअंतर्गत वहीतीधारक क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबास (पती-पत्नी व १८ वर्षाखालील अपत्य) प्रति वर्ष रक्कम रु.६०००/- लाभ (दर चार महिन्यांनी रु. २०००/- अशी वार्षिक समान तीन हप्त्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा केला जातो.

राज्यात पी. एम. किसान योजनेचे कामकाज उत्कृष्टरीत्या राबवले असल्याने या कामकाजाची नोंद देश पातळीवर घेण्यात आली. तथापि, माहे मार्च २०२१ पासून सदर योजनेच्या कामकाजावर विपरीत परिणाम झालेला आहे. पी. एम. किसान योजना कृषि विभागाकडे हस्तांतरीत करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

पी. एम. किसान योजना राबविण्यात येणा-या अडचणी विचारात घेवून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याच्या प्रस्तावास दि.३०.०५.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

PM Kisan Yojana Update शासन निर्णय

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १५ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असुन सदर योजना राबविताना येणा-या अडचणी विचारात घेऊन कोणताही पात्र लाभार्थी प्रस्तुत योजने अंतर्गत प्राप्त होणा-या लाभापासून वंचित राहू नये याकरीता सदर योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.

हे वाचले का?  ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाय करता नवीन ‘शरद शतम्’ योजना

नवीन अर्जदारांनी पीएम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे नोंदणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता प्रदान करणेबाबतची कार्यपध्दती येथे पहा

PM Kisan Yojana Update अर्जदार व विभागनिहाय करावयाची कर्तव्ये व जबाबदा-या:-

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत अर्जदार व विभागनिहाय खालीलप्रमाणे

*कर्तव्य व जबाबदा-या पार पाडावीत:-

1) अर्जदार :-

  • केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी करणे / तालुका कृषि अधिका-यांमार्फत/सामुहिक सुविधा केंद्रामार्फत (CSC) पोर्टलवर नोंदणी करावी.
  • ii) PM Kisan E-KYC ई-केवायसी करावे
  • iii) बँक खाते आधार संलग्न करावे
  • iv) शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करावी.

नवीन अर्जदारांनी पीएम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे नोंदणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता प्रदान करणेबाबतची कार्यपध्दती येथे पहा

हे वाचले का?  Fal Pik Vima Yojana 2023 फळपीक विमा २०२३ अर्ज सुरू.…असा करा अर्ज......

2) कृषि विभाग:-

  • i) स्वयं नोंदणीकृत लाभार्थीना मान्यता प्रदान करावी.
  • ii) तालुकास्तरावर लाभार्थीची पोर्टलवर नोंदणी करावी
  • iii) अपात्र लाभार्थीना पडताळणीअंती पोर्टलवर चिन्हांकित कराव.
  • iv) डाटा दुरुस्ती करावी (भूमी अभिलेखाशी संबंधीत माहिती वगळता
  • v) लाभार्थीची भौतिक तपासणी करावी 
  • vi) चूकीने अपात्र केलेल्या लाभार्थीना पात्र करावे
  • vii) मयत लाभार्थीची पोर्टलवर नोंद घ्यावी
  • viii) तक्रार निवारण करावे
  • ix सामाजिक अंकेक्षण करावे
  • x) योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी
  • xi) योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक इतर कामकाज करावे

अधिकृत शासन निर्णय येथे पहा

3 ) महसूल विभाग:-

  • १) भूमी अभिलेख नोंदीनुसार अर्जदार योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र / अपात्र असल्याबाबत पोर्टलवर प्रमाणित करावे
  • २) भूमी अभिलेखाशी संबंधीत माहिती दुरुस्ती करावी
  • ३) लाभार्थ्याच्या भूमी अभिलेख नोंदी अदययावत कराव्यात
  • ४) अपात्र लाभार्थीकडून लाभ परतावा वसुल करावा
  • ५) अपात्र लाभार्थीकडून केलेल्या वसुलीबाबत पोर्टलवर माहिती भरावी/ अदययावत करावी.
  • 4) ग्रामविकास विभाग:- पीएम- किसान योजनेंतर्गतचा लाभार्थी मयत झाल्यास त्यास पोर्टलवर मयत म्हणून मार्क करण्यासाठी त्याची माहिती तालुका नोडल अधिकारी यांना उपलब्ध करून दयावी.
  • *पीएम- किसान पोर्टलवर नोंदणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणेबाबतची खालीलप्रमाणे कार्यपध्दती अनुसरण्यात यावी*
हे वाचले का?  PM Vishwakarma Kaushal Samman Scheme पारंपरिक कौशल्य असलेल्या कारागीरांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना |

अधिकृत शासन निर्णय येथे पहा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

1 thought on “PM Kisan Yojana Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत”

  1. Pingback: PM Matru Vandana Yojana Update केंद्र शासनाच्या या योजनेद्वारे गर्भवती मातांना मिळते आर्थिक सहाय्य | - माहिती असायल

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top