Rules for ITR वित्त वर्ष 2023-24 आणि असेसमेंट इअर 2024-25 साठी आयटीआर भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. जी व्यक्ती करपात्र उत्पन्न गटात आहे, त्या व्यक्तीने आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे. दुसरीकडे जे लोक टॅक्स स्लॅबच्या बाहेर आहेत, त्यांना आयटीआर भरण्याची आवश्यकता नाही.
जुन्या कर वितरण प्रणालीनुसार ज्या लोकांचे उत्पन्म 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. तर नव्या करप्रणालीनुसार ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या व्यक्तीला कर देण्याची गरज नाही.
Income tax return टॅक्स रिटर्न पहिल्यांदाच भरत आहात..? या गोष्टी लक्षात घ्या
आयकर विभागाने रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंतची मुदत दिलेली आहे.
वेतनधारक व्यक्ती आयकर विभागाच्या ई – फाइलिंग वेबसाईटवर आय टी आर-1 फॉर्म वापरून रिटर्न्स भरू शकते. या फॉर्मला ‘सहज’ म्हणून ओळखले जाते.
नोकरीतून मिळणारे वेतन, घराच्या मालमत्तेतून येणारी मिळकत, तसेच गुंतवणूक करून मिळणारे व्याज आणि लाभांशातून येणारे उत्पन्न मिळणाऱ्या व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात.
Rules for ITR उत्पन्नाची किती मर्यादा आहे-
वर्षाला 50 लाख इतकी उत्पन्नाची मर्यादा आहे. पगारातून मिळणारे वेतन, घराच्या मालमत्तेतून येणारे उत्पन्न, कुटुंबाला मिळणारे निवृत्तीवेतन, शेतमालातून पाच हजार रूपयापर्यंतची मिळकत तसेच अन्य मार्गांनी येणारे उत्पन्न असलेले अर्ज दाखल करू शकतात.
बँकेतील ठेवी, पोस्ट खात्यातील बचत तसेच सहकारी बँकांमधील बचत त्खात्यावर मिळणाऱ्या व्याजाचे उत्पन्न असलेले आयटीआर – 1 चा फॉर्म भरू शकतात.
Rules for ITR आयटीआर भरण्याचा सोपा मार्ग कोणता-
एक्सेल युटिलिटीज,जावा युटिलिटीज द्वारे किंवा थेट ई- फायलिंग प्लॅटफॉर्मवर अर्ज भरता येतो.
थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरूनही दाखल केले जाऊ शकतात रिटर्न्स भरण्यासाठी ई- फायलिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची शिफारस केली जाते. त्यात कोणाच्या हस्तक्षेपाची शक्यता नसते. करदात्याची मेहनत व वेळेची बचत होते यासाठी https://www. Income tax.gov.in/ iec / foportal/ वर पॅन आधार आणि पासवर्ड सह लॉगिन करावे.
आयटीआय -1 भरण्यास कोण अपात्र
भारताचे सामान्य नागरिक नसलेले, अनिवासी भारतीय व्यक्ती, लॉटरी व्यवसाय, घोड्याच्या शर्यती, कायदेशीर जुगाड यातून कमाई करणारे.
लोगो किंवा दीर्घ मुदतीत भांडवली नफ्यातून कमाई करणारे एकापेक्षा अधिक घरांचे मालक असलेले.
कंपनीत संचालक असलेले, व्यापारातून कमाई करणारे
नोंदणीकृत नसलेल्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे.
कलम 194 एन नुसार बँकेतून काढलेल्या रोखीवर कर भरणारे.
एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन्स प्लान्सवर आयकर थकीत असणाऱ्या व्यक्ती.
परदेशी शेअर्स असलेले किंवा विदेशी शेअर्समधून लाभांश घेणारे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.