SBI Schemes मार्च महिना हा आर्थिक वर्षातील शेवटचा महिना. अनेक लोकांसाठी हा महिना महत्त्वाचा असतो. अपूर्ण असलेली आर्थिक कामं या महिन्यात पुर्ण करुन घ्यावी लागतात.
कर वाचवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात.
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर SBI च्या या योजनांमध्ये 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.
SBI WeCare FD योजना:
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून WeCare FD ग्राहकांना चांगले व्याज देण्यात येते. SBI च्या WeCare FD मध्ये ग्राहकांना गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी 31 मार्चपर्यंत त्यांना गुंतवणूक करता येईल.
सामान्य ग्राहकांपेक्षा बँकेकडून एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% अधिक व्याज देण्यात येते. SBI च्या WeCare FD एफ डी वर 7.5% व्याज मिळते. ग्राहकांना एसबीआयच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करायचे असेल तर कमीत कमी पाच वर्षे आणि जास्तीत जास्त दहा वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.
SBI होम लोन रेट:
गृहकर्जावर स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 31 मार्च 2024 पर्यंत ऑफर देण्यात आली आहे. 750-800 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून 8.60 % व्याजदराने कर्ज देण्यात येणार आहे. इतर वेळी कर्जाचा व्याजदर हा 9.15% असतो.
SBI Schemes एसबीआय अमृत कलश योजना:
अमृत कलश योजना ही एक प्रकारची FD योजना आहे. जर तुम्हाला स्टेट बँकेच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. अमृत कलश योजनेमध्ये बँकेकडून 7.10% व्याज देण्यात येते. एसबीआय च्या या योजनेमध्ये 400 दिवसांच्या एफडी वर 7.10% व्याज मिळते. गुंतवणूकदाराला जर या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदार मसुक, त्रैमासिक आणि सहमाहि व्याज इलवता येते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.