New Financial Year Update 1 एप्रिल पासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल; बघूया संपूर्ण माहिती |

New Financial Year Update

New Financial Year Update 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असते. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले की त्या वर्षासाठी बदल किंवा नवीन नियम लागू केले जातात. आपण बघणार आहोत की, 2024-25 या नवीन आर्थिक वर्षासाठी कोणकोणत्या नियमांमध्ये 1 एप्रिल पासून बदल होणार आहे. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

नॅशनल पेन्शन स्कीम(NPS):

नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एनपीएस या योजनेमध्ये सुरक्षेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता यामध्ये दोन फॅक्टर ऑथेंटीकेशन करावे लागणार आहे. म्हणजेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला आधी सारखे फक्त पासवर्ड टाकून लॉगिन करता येणार नाही. यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या खातेधारकांच्या खात्याचा ॲक्सेस हा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या सहज हाती पडणार नाही. यामध्ये तुम्हाला आधी नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे, आणि त्यानंतर रजिस्टर मोबाईलवर येणारा ओटीपी टाकावा लागणार आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर खातेधारकाला सहज त्याच्या खात्याचे तपशील पाहता येणार आहे.

New Financial Year Update: फास्टॅग(Fastag):

फास्टॅग साठीचे नवीन नियम हे एक एप्रिल पासून लागू होणार आहे. फास्टॅग चा वापर करत असलेल्या व्यक्तीने जर त्या व्यक्तीकडे असलेल्या फास्टॅग साठी बँकेकडे केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर अशा व्यक्तीला अडचणी येऊ शकतात. फास्टॅग केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर फास्टॅग बंद केला जाऊ शकतो. जरी तुमच्या फास्टॅग ला बॅलन्स असला तरीही तो प्रोसेस होणार नाही, तुम्हाला कुठलेही पेमेंट करता येणार नाही. याचा परिणाम म्हणून तुम्हाला डबल टोल भरावा लागू शकतो.

हे वाचले का?  Land Ceiling Act तुमच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते?

ओला मनी वॉलेट:

ओला मनी वॉलेट हे लहान Prepaid Payment Instrument-PPI मध्ये रूपांतरित होत असल्याचे ओलावणी वॉलेट कडून जाहीर करण्यात आले आहे. ग्राहकांचा ओला मनी वॉलेट मध्ये जास्तीत जास्त दहा हजार रुपये महिन्याला लोड करतात येणार आहे.

इन्कम टॅक्स:

प्राप्तिकर विभागाची न्यू टॅक्स रेजिम(New Tax Regime) ही 1 एप्रिल 2024 पासून Default असणार आहे. म्हणजे तुम्ही या पद्धतीने कर भरणार असं गृहीत धरले जाणार आहे.जर तुम्हाला तुमच्या जुन्या म्हणजेच ओल्ड टॅक्स रेजिम(Old Tax Regime) ने कर मोजणी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीला तसे सांगावे लागेल.

न्यू टॅक्स रेजिमचे टॅक्स स्लॅब्स:

 • 3 लाखांपर्यंत – 0%
 • 3-6 लाख 5%
 • 6-9 लाख – 10%
 • 9-12 लाख 15%
 • 12 ते 15 लाख – 20%
 • 15 लाखांच्या वरील उत्पन्न – 30%
हे वाचले का?  पुस्तकांचे गाव आता प्रत्येक जिल्ह्यात होणार

विमा योजना परत केल्यास मिळणारे पैसे:(New Financial Year Update)

जर एखाद्या ग्राहकाने एखादी विमा पॉलिसी विकत घेतली. काही वर्ष त्या पॉलिसीचे हप्ते भरले. परंतु काही कारणांमुळे पॉलिसी मॅच्युरिटी आधी बंद करायची असेल, किंवा ती पॉलिसी कंपनीला परत करायची असेल. त्या पॉलिसीसाठी त्या व्यक्तीने किती पैसे भरले आणि त्यामधील त्या व्यक्तीला किती पैसे परत मिळणार याला पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू म्हणतात. विमा पॉलिसी परत केल्यानंतर ग्राहकाला पैसे परत देताना विमा कंपनी सरेंडर चार्ज कापून घेत असते. जर एखाद्या ग्राहकाने अशी विमा पॉलिसी कंपनीला परत केली तर त्याचे मूल्य ठरविण्यासाठीचे जे काही नियम आहेत त्या नियमांमध्ये IRDAI ने बदल केले आहेत.

हे बदल 1 एप्रिल पासून लागू होणार आहे.

एखाद्या व्यक्तीने विकत घेतलेली विमा पॉलिसी ती व्यक्ती किती वर्षानंतर परत करते यावर त्या व्यक्तीला किती पैसे मिळणार हे ठरते.

एकदा पैसे भरून घेतलेल्या विमा योजनांसाठी:

 • जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसी घेतल्यानंतर तिसऱ्या वर्षी परत केली तर त्या व्यक्तीला भरलेल्या रकमेच्या 75 टक्के पैसे परत मिळतील
 • एखाद्या व्यक्तीने पॉलिसी ही शेवटच्या दोन वर्षांमध्ये कंपनीला परत केली तर या व्यक्तीला भरलेल्या रकमेपैकी 90 टक्के पैसे परत मिळतील.

मोबाईल वापराबाबत सरकारी अधिकारी / कर्मचारी यांच्यावर नियमावली.

हे वाचले का?  Title Clear Property 'टायटल क्लिअर' जमीन म्हणजे नेमकं काय?

पॉलिसीचे अनेक हप्ते भरले जातात त्यासाठी:

 • जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसी घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षी पॉलिसी बंद केली तर अशा व्यक्तीला त्या व्यक्तीने जे हप्ते भरले असते त्यापैकी 30 टक्के पैसे परत मिळतील
 • पॉलिसी जर तिसऱ्या वर्षी कंपनीला परत केली तर जे हप्ते भरलेले असतील त्या हप्त्यांच्या रकमेच्या 35 टक्के रक्कम परत मिळेल
 • पॉलिसी घेतल्यानंतर चौथ्या ते सातव्या वर्षात दरम्यान कंपनीला परत केली तर पॉलिसीधारक व्यक्तीला त्याने भरलेल्या हप्त्याच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम परत मिळेल

EPFO:

एखादी व्यक्ती जर ईपीएफओ ची सदस्य असेल आणि त्या व्यक्तीने नोकरी बदलली तर त्या व्यक्तीचा पीएफ बॅलन्स हा आपोआप नवीन संस्थेसोबत असलेल्या खात्यामध्ये ट्रान्सफर होईल. नवीन नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या व्यक्तीला आता पीएफ ट्रान्सफरची प्रक्रिया करावी लागणार नाही.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top