महत्वाचे मुद्दे :
टर्म प्लान घेतला असेल तर या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या –
मुदत संपल्यानंतर तुम्हाला लाभ मिळत नाही.
विम्याच्या मुदतीत तुम्हाला इतर कुठलाही आर्थिक लाभ मिळत नाही.
पॉलिसीवर कर्ज उचलता येणार नाही.
आणि विमा कंपनी बोनसही देत नाही.
एक जरी हप्ता चुकला तरी ही पॉलिसी रद्द होण्याची भीती असते त्यामुळे हप्त्यासाठी बँकेकडून ECS माध्यमातून पैसे वळतील अशीच व्यवस्था केलेली चांगली.
त्यामुळे ठरलेल्या दिवशी परस्पर पैसे वळले जातात.
टर्म इन्शुरन्स जर ऑनलाइन भरला तर फॉर्म हा बिनचूक भरावा स्वतः विषयीची खरी खरी माहिती द्या.
गुटखा सिगारेट अशा सवयी असतील तर स्पष्टपणे तशी माहिती द्या, यासाठी हप्ता थोडा जास्त बसेल मात्र खोटी माहिती देऊ नका. नाहीतर नंतर तुमच्या नॉमिनीला पैसे मिळवताना त्रास होईल.
तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा, व अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा.