Types Of Insurance जाणून घेऊ या विमा म्हणजे काय? हे आहेत विम्याचे प्रकार आणि फायदे ….!

4. वाहन विमा (Vehicle Insurance)

आपल्याकडे आपली कार, मोटरसायकल किंवा इतर कोणतेही वाहन असल्यास वाहन विमा योजना म्हणजेच वेहिकल इन्शुरन्स आपल्यासाठी अनिवार्य आहे. या प्रकारच्या पॉलिसीमुळे वाहनाचा अपघात किंवा वाहन चोरीस गेल्यास हा विमा उपयोगी ठरतो.

परंतु, काही वाहन विमा योजनांमध्ये थर्ड पार्टी पॉलिसी देखील केली जाते. ज्यामध्ये ड्रायव्हर किंवा पदचारी यांचा विमा हक्क सुद्धा सांगितला जाऊ शकतो.

वाहन ही आपल्या घरातील एक मौल्यवान वस्तू आहे. तसेच रस्त्यावर आज-काल किरकोळ अपघात होतच असतात. त्यामुळे अशा वाहनांच्या दुरुस्तीवर खर्च हा खूप प्रमाणात येतो

जर आपण वाहन पॉलिसीचा विमा उतरवला असेल तर आपल्याला घाबरून जाण्याची गरज नसते. कारण आपण आपल्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाल्यास विमा पॉलिसी कंपनीला आपला दावा करू शकतो.

5. गृह विमा (Home Insurance information)

गृह विमा म्हणजेच होम इन्शुरन्स मध्ये केलेल्या विम्यामध्ये आपल्या घराच्या बांधकाम साहित्याच्या आणि संरचनेनुसार पॉलिसी तयार केली जाते. या विम्यामध्ये घराचे किंवा घरगुती वस्तूंच्या नुकसानीवर विमा करता येतो. हा विमा घर कोसळणे, अपघात होणे, वस्तू चोरी, जाणे घरास आग लागणे, किंवा कोणत्याही प्रकारे घराचे नुकसान झाल्यास त्यातील सामानाचे नुकसान झाल्यास हा विमा लागू होतो.

6. प्रवास विमा (Travel Insurance)

प्रवास हा आपल्या सर्वांनाच आवडतो तुम्ही जर एकटे किंवा तुमच्या कुटुंबासोबत कुठे प्रवास करणार असाल तर प्रवास विमा किंवा ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणे हे चांगले. प्रवासात विलंब झाल्यास किंवा प्रवास रद्द झाल्यास, प्रवासादरम्यान अपघात झाल्यास अशा परिस्थितीमध्ये विमा कंपनी नुकसान भरपाई देते. फॅमिली ट्रॅव्हल इन्शुरन्स अंतर्गत केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला देखील विमा संरक्षण मिळते.

7. पीक विमा किंवा शेतकरी विमा (Crop/Farmer Insurance)

मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही दरवर्षी पिक विमा काढायलाच हवा आताच्या या वातावरणामध्ये हवामानाचा काहीच भरोसा नाहीये, कधीही पाऊस पडू शकतो किंवा नाही परंतु आपण आपल्या पिकाचा विमा काढल्यास आपण चिंता न करता शेती करू शकतो. जर पाऊस पडत नसेल, किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपले पीक नष्ट झाले तर, विमा कंपनी आपल्याला नुकसान भरपाई देते.

8. इतर प्रकारची विमा योजना

पाळीव प्राणी विमा (Pet Insurance)
राजकीय जोखीम विमा (Political Risk Insurance)
विवाहासाठी विवाह विमा (Marriage Insurance)

अशा प्रकारचे अनेक विमे उपलब्ध आहेत तुम्ही नीट विचार करून तुम्हाला जो हवा तो विमा घेऊ शकता.

हे ही वाचा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top