Flood Damage Insurance पावसाच्या पुरामध्ये गाडी खराब झाली किंवा वाहून गेली तर, भरपाई कशी मिळेल?

नुकसान भरपाई :

शासन हे पावसाळ्यामध्ये लोक वस्त्यांमध्ये पुर सदृश्य परीस्थिति निर्माण झाली असेल तर आधी लोकांना वाचवत असते. त्यांच्या घरातील सामान, गाड्या हे तशाच पाण्यात पडून असतात, व त्याची भरपाई ही त्यांना मिळत नाही, कारण ही एक नैसर्गिक आपत्ती आहे.

तुमच्याकडे सर्वसमावेशक कव्हरेज असेल तरच पुरामुळे होणारे नुकसान कव्हर केले जाते, आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स सारखे अनिवार्य नाही. सर्वसमावेशक कार विमा इन्शुरन्स पूर, भूकंप, चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे तुमच्या कारचे नुकसान कव्हर करते.

नुकसान भरपाई कशी मिळेल?

तुमच्या वाहनावर झाड पडल्यामुळे किंवा दरड कोसळल्यामुळे किंवा तुमची गाडी जर पुराच्या पाण्यात वाहून गेली किंवा त्याच्यामुळे तुमच्या गाडीच्या इंजिनला काही नुकसान झाले तर, तुमच्याकडे फक्त एकच पर्याय आहे कार इन्शुरन्स… मग तो कोणत्याही प्रकारचा असो या इन्शुरन्स मुळे तुम्हाला तुमचे नुकसान भरपाई मिळते.

तुमच्याकडे जर कार इन्शुरन्स किंवा बाईक इन्शुरन्स नसेल तर ती नुकसान भरपाई तुम्हालाच सहन करावी लागणार आहे. इन्शुरन्स मध्ये सुद्धा जर इनबिल्ट इलेक्ट्रॉनिक च्या वस्तूंमध्ये बिघाड झाल्यास तुम्हाला इन्शुरन्स द्वारे क्लेम मिळतो. मात्र, तुम्ही जर तो बदलून महागडी म्युझिक सिस्टम बसून घेतलेली असेल तर, त्याचे नुकसान भरपाई तुम्हाला मिळत नाही. म्हणूनच त्या स्पेसिफिक पार्ट चा सुद्धा इन्शुरन्स घेणे तुम्हाला गरजेचे आहे.

दरड कोसळल्यामुळे गाडीचे ऑन डॅमेज झालेल असेल तर, ऑन डॅमेज इन्शुरन्स कव्हर मध्ये तुम्हाला तो भेटून जाऊ शकतो, असे काही घडल्यास गाडीचा व्हिडिओ काढून इन्शुरन्स कंपनीला पाठवून द्या.

तुम्ही जर थर्ड पार्टी इन्शुरन्स काढलेला असेल तर पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेल्यास तुम्हाला तो मिळणार नाही.

तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top