मृत्युपत्र /Death Will म्‍हणजे काय? चला समजून घेऊया!

मृत्‍युपत्र स्‍टँप पेपरवरच केलेले असावे काय?

नाही. Death Will साध्या कागदावरही करता येते.

मृत्‍युपत्र नोंदणीकृतच असावे असे बंधन आहे काय?

  • नाही.  मृत्‍युपत्र नोंदणीकृत असावे असे कोणतेही बंधन कायद्यात नाही.
  • नोंदणी अधिनियम १९०८, कलम १८ अन्वये मृत्‍युपत्राची नोंदणी वैकल्पिक आहे. तथापि, Death Will नोंदणी करता येते, रुपये शंभरच्‍या स्‍टँप पेपरवर मृत्युपत्र नोंदणीकृत केलेले असल्यास पुढे कायदेशीर अडचणी उद्भवत नाहीत.

मृत्युपत्र करण्‍यास सक्षम व्‍यक्‍ती कोण असतात?

भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- ५९ अन्वये,

  • Death Will करणारी व्यक्ती वयाने सज्ञान असावी तसेच मानसिकदृष्‍ट्‍या सुदृढ असावी, ती दिवाळखोर नसावी.
  • मुक किंवा बधीर किंवा अंध व्‍यक्‍ती, जर त्‍यांना परिणामांची जाणीव असेल तर, मृत्युपत्र करु शकतात.  
  • Death Will स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीतील फक्त स्वत:च्या हिश्शाबाबत करता येते.
  • हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६, कलम ३० अन्‍वये हिंदू व्‍यक्‍तीला एकत्र कुटुंबाच्‍या मिळकतीमधील स्वत:च्या हिश्शाबाबत मृत्युपत्र करता येते.वेडसर व्‍यक्‍ती, जेव्‍हा वेडाच्‍या भरात नसेल तेव्‍हा मृत्युपत्र करु शकते. परंतु वेडाच्या भरात, नशेत, आजारात, शुद्धीवर नसताना, फसवणुकीने, दबावाखाली करण्यात आलेले मृत्युपत्र विधीग्राह्य असणार नाही.

जमा केलेले मृत्युपत्र (Deposited Will) म्‍हणजे काय?

नोंदणी कायदा, १९०८, कलम ४२ अन्‍वये मृत्युपत्र, पाकीटात बंद/सील करुन दुय्‍यम निबंधकाकडे जमा करता येते. याला जमा केलेले Deposited Will म्हणतात.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top