Annabhau Sathe Karj Yojana कर्जामध्ये महामंडळाचा हिस्सा रु. 85 हजार (85%), अनुदान रक्कम रु. 10 हजार (10%), अर्जदाराचा सहभाग रु.5 हजार (5%) असे एकूण 1 लाख रुपये कर्ज (100%) देण्यात येते. तीन वर्ष (36 महिने) कालावधीसाठी दर साल दर शेकडा 4 टक्के व्याजदराप्रमाणे कर्ज दिले जाते. या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण 65 लाभार्थींचे रक्कम रु. 65 लाखांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
Annabhau Sathe Karj Yojana पात्रता व निकष :
- अर्जदार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा जातीतील असावा.
- अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.
- अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.
- अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षीत असावा.
- अर्जदाराचा Cibil Credit Score 500 च्या वर असावा.
येथे क्लिक करून पहा कर्ज प्रक्रिया
आवश्यक कागदपत्रे :
- सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला जातीचा दाखला,
- अर्जदाराच्या कुटुंबाचा तीन लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला,
- नुकतेच काढलेले दोन फोटो,
- अर्जदाराचा शैक्षणिक पुरावा/शाळेचा दाखला,
- आधार कार्ड,
- रेशनकार्ड,
- पॅनकार्ड,
- ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागा उपलब्धतेचा पुरावा ( भाडे पावती, करारपत्र),
- व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभव दाखला,
- यापूर्वी शासकीय कर्ज योजनेचा व अनुदानाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र,
- शॉप ॲक्ट/ग्रामसेवकाचे व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला.
- व्यवसायासंदर्भात साहित्य/माल खरेदीचे दरपत्रक/कोटेशन,
- अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे/करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
येथे क्लिक करून पहा कर्ज प्रक्रिया
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.