Bandhkam Kamgar Yojana पहा बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाच्या कोणत्या सुविधा आहे |

Bandhkam Kamgar Yojana

Bandhkam Kamgar Yojana महाराष्ट्र शासन शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू मानून अनेक योजना राबवित असते. या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानाअंतर्गत आज आपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती.

बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य विषयक सुविधा, आर्थिक सहाय्य, आदी विविध सुविधा देत आहे. या सुविधांमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुसह्य होण्यास मदत होत आहे.

Bandhkam Kamgar Yojana बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सुविधा:

१) सामाजिक सुरक्षा-

  • विवाहाच्या खर्चाची प्रतिपूर्ती रुपये ३० हजार
  • मध्यान्ह भोजन – कामाच्या ठिकाणी दुपारी पौष्टिक आहार
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
  • व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप
  • अवजारे खरेदी करिता ५ हजार रुपये मदत
  • सुरक्षा संच पुरविणे अत्यावश्यक संच पुरविणे
हे वाचले का?  Schemes for Women महिलांना आधार देणाऱ्या निवासी योजना |

बांधकाम कामगार सुविधा येथे क्लिक करून पहा

आवश्यक कागदपत्रे –

  • सर्व योजनांकरिता आवश्यक
    • अर्जदाराचा फोटो,
    • आधार कार्ड,
    • रेशन कार्ड.
    • बँक पासबुक झेरॉक्स
    • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • सामाजिक सुरक्षा योजनेकरिता
    • शपथपत्रआणि हमीपत्र (योजनेनिहाय)
    • विवाह नोंदणी प्रमाणपत्र (विवाह खर्च प्रतिपूर्ती योजना)

बांधकाम कामगार सुविधा येथे क्लिक करून पहा

(२) शैक्षणिक सहाय्य-

या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

  • इयत्ता पहिली ते सातवी प्रतिवर्ष रु. २ हजार ५०० आणि इ. आठवी ते दहावी – प्रतिवर्ष रु. ५ हजार.
  • इयत्ता दहावी व बारावीमध्ये ५०% पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. १० हजार.
  • इयत्ता अकरावी व बारावी च्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष रु. १० हजार.
  • पदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष रु. २० हजार.
  • MSCIT शिक्षण मोफत
  • वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रतिवर्ष रु. १ लाख व अभियांत्रिकी शिक्षणाकरिता – रु. ६० हजार.
  • शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्ष रु. २० हजार व पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिवर्ष रु. २५ हजार.
हे वाचले का?  Sanjay Gandhi Niradhar Yojana update संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन |

शैक्षणिक योजने कागदपत्रे

  • पाल्याचे शाळेचे ओळखपत्र
  • ७५% हजेरीचा शाळेचा दाखला
  • किमान ५०% गुण मिळाल्याची गुणपत्रिका.
  • दहावी व अकरावीची गुणपत्रिका मागील
  • शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (वैद्यकीय, अभियांत्रिकी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी )
  • MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top