Home Loan Schemes गृहकर्जावर करता येणार मोठी बचत | या योजनांवर सरकार देत आहे अनुदान |

Home Loan Schemes

Home Loan Schemes आपल्या भारतात सणासुदीचा काळ हा घर खरेदी, गाडी खरेदी साठी शुभ समजला जातो. दिवाळी तसेच नवरात्री मध्ये घर खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो.

सणाच्या काळात रिअल इस्टेट मध्ये अनेक ऑफर्स असतात. घर खरेदी किंवा वाहन खरेदी किंवा इतर गुंतवणूक करायची असेल तर प्रत्येक बाबतीत हा काळ चांगला असतो.

सामान्य नागरिकांसाठी भारत सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते.

या योजनांवर सरकारकडून अनुदान देखील मिळते. सरकारी योजनांमुळे अनेक लोकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळते.

Home Loan Schemes लहान नागरी घरांसाठी व्याज अनुदान योजना:

छोट्या शहरी घरांसाठी अनुदान देण्यासाठी भारत सरकारकडून ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत 9 लाख रूपयांपर्यंतच्या कर्जावर 3% ते 6.5 % पर्यंत अनुदान मिळते.

हे वाचले का?  Annasaheb Patil Loan Scheme युवकांना आर्थिक सक्षम बनविणारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व्याज परतावा योजना

GST कपात:

सरकारकडून जे घर सामान्यांना परवडतात अशा घरांसाठी बांधकाम मालमत्तेवर असलेला जीएसटी हा 12 टक्के होता तो आता 5 टक्के करण्यात आला आहे.

तसेच इतर मालमत्तेवर असलेला कर 18 टक्के होता तर तो आता 5 टक्के करण्यात आला आहे.

यामुळे मालमत्तेची एकूण किंमत आणि कर्जाची रक्कम कमी होण्यास मदत होऊ शकते.

मुद्रांक आणि नोंदणी शुल्कात सूट:

सणाच्या काळात काही राज्य सरकारांकडून मुद्रांक आणि नोंदणी शुल्कामध्ये सूट दिली जाते. या मिळणाऱ्या सूट चा तुम्ही फायदा घेऊ शकता.

मोदी आवास योजना:

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर अनुदान मिळते.

ज्या व्यक्तीला या योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल, तर ती व्यक्ति घरबसल्या अर्ज करू शकते.

हे वाचले का?  RD loan आरडी वर कर्ज काढता येते का? पहा संपूर्ण माहिती |

ज्या व्यक्तीचे आर्थिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशी व्यक्ति या योजनेचा लाभ घेऊ शकते. सरकारकडून अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते.

या योजनेअंतर्गत अनुदान हे तीन टप्प्यात दिले जाते. पहिला हप्ता हा 50 हजार रुपये दिल जातो. दूसरा हप्ता 1.5 लाख रूपये तर तिसरा हप्ता 50 हजार रुपये दिल जातो.

कर्जावर असलेले व्याजदर हे कमी आहे.

क्रेडिट  लिंक्ड सबसिडी योजना

या योजनेअंतर्गत अशा व्यक्तींना लाभ मिळतो:

  • ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न असणारा ग्रुप (LIG-1)
  • ज्यांचे उत्पन्न 6 लाख ते 12 लाख आहे असे मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्ति,(MIG-1)
  • ज्यांचे उत्पन्न 12 लाख ते 18 लाख आहे असे (MIG-2)
हे वाचले का?  Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी |

या योजनेअंतर्गत घेतलेल्या गृहकर्जावर अनुदान मिळते. या योजनेअंतर्गत 2.6-7 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “Home Loan Schemes गृहकर्जावर करता येणार मोठी बचत | या योजनांवर सरकार देत आहे अनुदान |”

  1. Shrikrishna Pangam

    क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना म्हणजे काय तो अर्ज कसा करायचा कोणाकडे करायचं. त्याचे नियम आणि अटी काय आहेत हे कळाले तर बरे होईल.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top