Character Certificate खासगी काम असेल, शासकीय काम असेल किंवा इतर कोणतेही काम असेल, तर चारित्र्य प्रमाणपत्राची गरज पडते. चारित्र्य प्रमाणपत्र काढण्यासाठी पोलिस स्टेशन मध्ये अर्ज करावा लागतो. अर्जदाराने अर्ज केल्यानंतर सर्व माहितीची पडताळणी केली जाते आणि त्या नंतर त्या व्यक्तिला चारित्र्य प्रमाणपत्र दिले जाते.
चारित्र्य प्रमाणपत्र काय असते, यासाठी कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत, तसेच अर्ज कसा करायचा याविषयीची माहिती या लेखामध्ये बघणार आहोत. लेख पूर्ण वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.
Character Certificate चारित्र्य प्रमाणपत्र काय असते?
समाजामध्ये आपले चारित्र्य कक्ष प्रकारचे आहे, आपली वागणूक कशी आहे हे चारित्र्य प्रमाणपत्रावरून सिद्ध होते.
चारित्र्य प्रमाणपत्र घेण्यासाठी पोलिस स्टेशन मध्ये अर्ज करावा लागतो.
यामध्ये तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाते.
चारित्र्य प्रमाणपत्राची गरज कोणाला पडते?
पासपोर्ट काढण्यासाठी, नोकरीसाठी तसेच इतर काही खासगी काम असेल तर त्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.
चारित्र्य प्रमाणपत्रासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागतो. ज्या पोलिस स्टेशन मध्ये अर्ज केला आहे, त्याच ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र मिळते.
आवश्यक कागदपत्रे:
- पत्त्याचा पुरावा
- ओळखीचा पुरावा
- वयाचा पुरावा
- ज्या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र द्यावयाचे आहे तेथील चारित्र्य मागणी पत्र
Character Certificate अर्ज कसा करावा?
चारित्र्य प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अर्जदार ज्या पोलिस स्टेशन च्या हद्दीत राहत असेल, त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो. वेबसाइट वर जाऊन नोंदणी करायची व आवश्यक असलेली सर्व माहिती भरावी लागते.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.