Credit Card Use आजच्या काळात क्रेडिट कारणामुळे सर्वकाही सोपे झाले आहे. क्रेडिट कार्डवर मिळणारे कॅशबॅक, रिवार्ड्स, विविध ऑफर्स तसेच क्रेडिट कार्डवर पैसे वापरता येतात. यामुळे क्रेडिट कार्डचा वापर सर्रास होताना दिसतो.
परंतु क्रेडिट कार्डचा वापर Credit Card Use योग्यरीत्या केला तर फायद्याचे ठरते. जर क्रेडिट कार्डचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला तर ती कार्डधारकास डोकेदुखी ठरू शकते. क्रेडिट कार्डच्या चुकीच्या वापरामुळे वापरकर्त्याचा क्रेडिट स्कोर देखील खराब होऊ शकतो. परंतु याच कार्डच्या चांगल्या वापरामुळे क्रेडिट स्कोर सुधारण्यास मदत होते.
मोफत माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Credit Card Use क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे
क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रोख रक्कम काढू नका:
एटीएम मधून क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढू नका, कारण त्यावर भरपूर फी आकारली जाते. ज्या दिवशी तुम्ही एटीएम मधून क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढतात त्या दिवसापासून व्याज चालू होते. Credit Card
Credit Card ड्यू डेट चुकवू नका:
क्रेडिट कार्डचा वापर करताना सर्व बिल वेळेत भरले गेले की नाही याची काळजी घेतली पाहिजे. बिल भरण्याची अंतिम तारीख म्हणजेच ड्यू डेट चुकवू नका. ड्यू डेट चुकल्यानंतर जास्त पैसे द्यावे लागतातच. शिवाय सिबिल स्कोर वर देखील परिणाम होतो.
Credit Card Use एक पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड नको:
अनेक लोकांकडे एका क्रेडिट कार्ड पेक्षा अनेक क्रेडिट कार्ड असतात. परंतु क्रेडिट कार्ड वापरायचे असेल तर कोणत्याही एकाच बँकेचे क्रेडिट कार्ड वापरावे.
जर एकच क्रेडिट कार्ड असेल तर अनावश्यक खर्च होत नाही. त्याचप्रमाणे जर वेगवेगळे क्रेडिट कार्ड असतील तर त्या वेगळ्या क्रेडिट कार्डची प्रोसेसिंग फी जास्त असते. त्यामुळे एका क्रेडिट कार्डचा वापर मुळे अनावश्यक खर्च टाळता येतो.
तुकडेबंदी कायदामधील महत्त्वाच्या तरतुदी
डिस्काउंट चा उपयोग करून शॉपिंग करू नये:
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध असतात. परंतु या ऑफर आणि कार्डवर असणाऱ्या सवलती मुळे क्रेडिट कार्डचा वापर करू नये.
अति आवश्यक असेल तरच क्रेडिट कार्डचा वापर करावा. जर कार्डवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स ला बळी पडून क्रेडिट कार्ड वापरले तर कार्ड वापरणारी व्यक्ती कर्जाच्या जाळ्यात फसू शकते.
कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्या वस्तूच्या खरेदी आधी आपण त्या वस्तूची परतफेड करू शकतो का याचा विचार नक्की करावा.
पैसे किती खर्च करायचे हे लक्षात ठेवावे:
कमी उत्पन्न असलेले लोक सर्रास क्रेडिट कार्डचा वापर करताना दिसतात. परंतु क्रेडिट कार्डचा वापर करताना एकूण लिमिटपेक्षा 30 टक्केच रक्कम वापरली गेली पाहिजे. त्यापेक्षा जास्त खर्च करणे टाळावे. जास्त खर्च केल्यास त्याचा परिणाम क्रेडिट युटीलायझेशन रेशोवर पडू शकतो.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.