Tukade Bandi Kayda तुकडेबंदी कायदा परिचय
१९४७ च्या तुकडेबंदी कायदा (Tukade Bandi Kayda) व जमिन एकत्रीकरण कायद्याचे दोन भाग पडतात. पहिला भाग हा तुकडे बंदी बाबत असून, दुस-या भागामध्ये जमिन एकत्रीकरण योजनेसंबंधीची कार्यपध्दती दिलेली आहे. किफायतशीरपणे शेती करण्यास अडचण येईल असे जमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत हा तुकडेबंदी संबंधीच्या तरतुदीचा उद्देश आहे.
यासाठी राज्यातील निरनिराळ्या स्थानिक क्षेत्रासाठी प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केलेली आहेत. अशा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा एखादया जमिनीचे क्षेत्र कमी असेल त्यास तुकडा असे समजणेत येते. गावाच्या अधिकार अभिलेखात ही त्यांची तुकडा अशी नोंद घेण्यात येते.
तुकडेबंदी कायदा विरुद्ध व्यवहार नियम येथे पहा
तुकडेबंदी कायदा तुकडे पाडण्यास मनाई येथे पहा
प्रमाणभूत क्षेत्र वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीसाठी वेगवेगळे ठरविणेत आले आहे.
जमिनीचा प्रकार व त्याचे प्रमाण:
- बागायत- ०/२० हे. आर
- जिरायत- ०/४० हे. आर
- तरी/भात- ०/२० हे. आर
- वरकस -०/८१
अशा तुकडयाचे फक्त लगतच्या जमिनी मालकाकडेच हस्तांतरण करता येते. तसेच कोणत्याही जमिनीचे विभाजन किंवा हस्तांतरण करतांना जमिनीचा नवा तुकडा होता कामा नये असे बंधन आहे. दिवाणी कोर्टाच्या डिक्रीनुसार किंवा वाटपामुळे ही नवीन तुकडा निर्माण करता येत नाही. मात्र जमिन सुधारणा कर्ज घ्यावयाचे असल्यास भू. विकास बँक राष्ट्रीयीकृत बँका याना असा तुकडा गहाणवटीने देता येतो.
तुकडेबंदी कायदा विरुद्ध व्यवहार नियम येथे पहा
तुकडेबंदी कायदा तुकडे पाडण्यास मनाई येथे पहा
तसेच काही सार्वजनिक हिताच्या उद्दिष्टासाठी तुकड्याची विक्री करता येते. नव्या दुरूस्ती कायद्यानुसार तुकडे बंदी संबंधीच्या तरतुदीमध्ये कसलाही बदल केलेला नाही.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुकडेबंदी कायदा PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक कारा
6 yekar jamin ghyayala ha kayada lagto ka
खुपच छान माहिती. आज पर्यत आम्ही कधी विचारच केला नाही.