PF Interest नमस्कार मित्रांनो व्याजदर दरवाढीचे प्रमाण हे वाढलेल्या असून ते किती प्रमाणात व किती टक्क्यांनी वाढलेला आहे. याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.
PF Interest पीएफ व्याजदर :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये 7 कोटींहून जास्त खातेधारक यांना ह्या वर्षातील सर्वात मोठी बातमी मिळालेली आहे. की, मागील दोन आर्थिक वर्षांपासून 8.10% व्याज खातेधारकांना मिळत होते. मात्र जवळपास 8.15 % व्याज हे यावर्षी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. याच्या आधी 1977 -1978 मध्ये PF चा सर्वात कमी व्याजदर म्हणजेच 8% एवढा होता.
पेच :
EPFO यांचेकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर PF खाते ज्या व्यक्तींकडे आहे त्यांना हा नवीन व्याजदर लागू करण्यात येणार आहे असे नाही, त्यासाठी शासनाची मंजुरी घेणे गरजेचे असणार आहे. 2022 -23 साठी निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरचा वित्त मंत्रालयाकडून आढावा घेण्यात येणार आहे, आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्याची प्रोसेस सुरू होणार आहे. या सर्वांत विशेष बाब म्हणजे 2021 -22 या आर्थिक वर्षामध्ये व्याजाचे पैसे अजूनही PF खातेधारकांना देण्यात आलेले नाहीत.
व्याजदराचा निर्णय :
या आधी 8% एवढे व्याज ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार होता त्यावेळी PF खात्यावरील व्याजदर हा खाली जाण्याची चर्चा होत होती मात्र वाढत्या महागाईला लक्षात घेऊनच PF खातेदारांना अधिक व्याज द्यावे असे मत झाले आहे.
भूपेंद्र यादव केंद्रीय कामगार मंत्री आणि विश्वस्तांमध्ये बैठकीच्या पहिल्याच दिवशी वाढीव पेन्शनच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती, तसेच EPFO कडून सुद्धा पात्र खातेधारकांना जास्त पेन्शन देण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे, अशी माहिती देण्यात आलेली होती.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- Life Imprisonment 14 Years? जन्मठेप 14 वर्ष असते का ?
- Z Plus Security काय असते? Z Plus Security in Marathi
- फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana
- मोबाईल वापराबाबत सरकारी अधिकारी / कर्मचारी यांच्यावर नियमावली.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.