How to take sample for soil testing असे तपासा जमिनीचे आरोग्य…… हे आहेत याचे फायदे…!!!

How to take sample for soil testing मातीचा नमुना कसा घ्यायचा?

How to take sample for soil testing मातीचा नमुना घेण्यासाठी असा ठराविक कालावधी नाही. वर्षभरात कधीही आपण मातीचा नमुना घेऊ शकतो. साधारणपणे रब्बी पिकांच्या काढणी झाल्यानंतर किंवा उन्हाळ्यात नमुना घेतला तर पेरणी पर्यंत माती परिक्षणाचा अहवाल उपलब्ध होतो.

पीक काढणी झाल्यानंतर ज्यावेळेस जमीन कोरडी असते, अशावेळी मातीचा नमुना घ्यावा. जर पिकांना खत टाकले असेल तर त्यानंतर लगेच मातीचा नमुना घेऊ नये. soil sample collection and preparation

मातीचा नमुना घेताना शेताचा रंग, उतार, पोत, खोली याप्रमाणे वर्गीकरण करावे. प्रत्येक भागातून एक स्वतंत्र नमुना घ्यावा.

बांधा जवळील जागा, झाडाखालील जमीन, शेतातील गुरे बांधण्याची जागा, पाणथळ जागा, शेतातील बांधकामा जवळचा परिसर अशा परिसरातून मातीचा नमुना घेऊ नये.

सपाट पृष्ठभागावर 30*30*30 सेंटिमीटर लांब, रूंद व खोल असा खड्डा घ्यावा. त्यात दोन सेंटिमीटर जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने खरडून हातावर काढावी.

त्यानंतर प्लास्टिकच्या बादलीत घ्यावी. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणाहून पाच ते दहा नमुने घ्यावे.

ही नमुने घेतलेली माती एका कागदावर पसरून ती मिसळून घ्यावी. त्या ढिगाचे चार भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाकावे.

उरलेले दोन भाग पुन्हा मिसळावे व पुन्हा चार भाग करावे. अशी प्रक्रिया अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत करावी.

ही माती एका स्वच्छ कापडी पिशवीत भरावी. तसेच त्यामध्ये एका कागदावर शेतकऱ्याचे नाव, पत्ता, गट किंवा सर्वे नंबर, जमिनीचा प्रकार, ज्या दिवशी नमुना घेतला त्या दिवशीची तारीख, तसेच मागील हंगामात घेतलेल्या पीक व त्याचे उत्पादन किती झालं, तसेच पुढील हंगामात घ्यावयाचे पीक ही सर्व माहिती लिहावी.

आणि हा नमुना स्थानिक कृषी विभागाच्या माती परीक्षण प्रयोग शाळेत पाठवावा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top