Magel Tyala shettale मागेल त्याला शेततळे योजना अर्ज सुरू | असा करा अर्ज | पहा संपूर्ण माहिती

Magel Tyala shettale

Magel Tyala shettale राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असते. मागेल त्याला शेततळे ही अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. या लेखामध्ये आपण बघणार आहोत की शेततळे योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे, अनुदान किती मिळणार आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कसा करायचा. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

शासन नियम व अटी:

 • कृषी विभागाचे कृषी सहाय्यक/ कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक शासनाचा शेततळे तयार करण्याचा आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक.
 • लाभार्थीने स्वतःचा राष्ट्रीयकृत बँक/ इतर बँकेमधील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्य/ कृषी सेवक यांचेकडे पासबुकच्या झेरॉक्स सह सादर करावा.
हे वाचले का?  Kanya Van Samruddhi Yojana शेतकऱ्यांना रोपांचे मोफत वाटप

 • कामासाठी कोणतेही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
 • शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीची लागवड करावी.
 • शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील.
 • पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्यांनी स्वतः करावी.
 • लाभार्थ्याच्या सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक राहील.

 • शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्यांनी स्वखर्चाने लावणे बंधनकारक.
 • नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारचे हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई अनुज्ञेय राहणार नाही.
 • मंजूर आकारमाचे शेततळे खोदणे हे लाभार्थीस बंधनकारक राहील.
 • इनलेट आउटलेट विरहित शेततळी घेणाऱ्या लाभार्थीकडे शेततळ्यामध्ये पाणी उचलून टाकण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच अशा शेततळ्यासाठी शेतकऱ्यांनी प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे.

Magel Tyala shettale लाभार्थी पात्रता:

 • शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी. यात कमाल मर्यादा नाही.
 • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्या करिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरन करणे शक्य होईल.
 • यापूर्वी अर्जदारांनी शेततळे सामुदायिक शेततळे या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
हे वाचले का?  Annabhau Sathe Karj Yojana लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज योजना

लाभार्थी निवड खालील प्राथमिकतेनुसार होईल:

दारिद्र्य रेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्याची निवड करण्यात येईल.

इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणारे शेतकऱ्यांची जेष्ठता यादीनुसार म्हणजेच प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे या योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल.

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे आणि किती अनुदान मिळणार?

Magel Tyala shettale शेततळ्याचे आकारमान:

आकारमान निहाय शेततळ्याचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ आणि अपेक्षित खोदकाम खालील प्रमाणे राहील

या योजनेअंतर्गत वरील प्रमाणे विविध आकारमानाच्या शेततळ्यांपैकी कोणतेही एका आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त 30*30*3 मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आउटलेटसह प्रकारांमध्ये किमान 15*15*3न मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल. तसेच इनलेट आउटलेट विरहित प्रकारांमध्ये किमान 20*15*3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल. इनलेट आउटलेट विरहित प्रकारांमध्ये पाणी भरण्याची कार्यवाही पावसाळ्यात अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्यातून प्राधान्याने करावी.

हे वाचले का?  Private Hospital Corona Patients Bill | खाजगी हॉस्पिटल्स मधील कोरोना रूग्णावरील उपचार खर्च परत मिळणार |

येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे आणि किती अनुदान मिळणार?

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top