HUMAN RIGHTS COMMISSION कडे तक्रार कशी करावी?

HUMAN RIGHTS COMMISSION कोण व कोणत्या तक्रारी दाखल करू शकतो?

HUMAN RIGHTS COMMISSION कोणत्याही शासकीय अधिकान्यांकडून कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही व्यक्तीच्या मानवी अधिकारांचे हनन झाल्यास अशी पिडीत व्यक्ती अशा शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या विरोधात मानव अधिकार आयोगाकडे तक्रार करून न्याय मागू शकता.

HUMAN RIGHTS COMMISSION अशा घटनाविरूद्ध तक्रार करता येईल

  • उदा : पोलीसांकडून सामान्य व्यक्तीची जर छळवणूक होत असेल तर मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करता येते.
  • पोलीस कोठडीत जर आरोपीला अमानवीय पद्धतीने मारहाण व छळ होत असल्यास,
  • पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्यास
  • ४) तुरूंगात तसेच बाल व महिला सुधारगृहात दाखल व्यक्ती, मुले किवा महिला यांना अमानवीय वागणूक मिळत असेल किंवा त्यांचा छळ होत असल्यास,
  • पोलीसांशिवाय कोणत्याही शासकिय अधिकार्‍याने कोणत्याही भारतीय व्यक्तीच्या मानव अधिकारांचे हनन करण्याची कसूर होत असल्यास जात, धर्म, लिंग, भाषा यावरून व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असल्यास मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करता येते.

उदा: मालमत्ता किंवा संपत्ती खरेदी करण्यात सरकारी अधिकारी प्रतिबंध करीत असल्यास लेखन, भाषण, संचार करण्यास प्रशासकीय व्यवस्था अडथळा आणत असल्यास.

  • पोलीसांनी किंवा अन्य सरकारी अधिकार्‍यांनी खोटी तक्रार किंवा खोटा आरोप लावून तसेच आपली फसवणूक करून जर आपला मानसिक आर्थिक व शारिरिक छळ चालवला असेल तर मानव अधिकार आयोगाकडे दाद मागता येते.

भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकांस त्याचे मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून एखाद्या व्यक्तीच्या या हक्कांची पायमल्ली झाल्यास त्यावेळी त्या नागरिकांच्या मदतीला मानवी हक्क आयोग धावून येतो.

जाणून घेऊया आयोगाच्या कार्य पद्धतीविषयी मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ हा २८ सप्टेंबर १९९३ रोजी लागू झाला. राज्य मानवी हक्क आयोग नोव्हेंबर २००१ रोजी स्थापन झाला.

हे ही वाचा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ  पाहन्यायासाठी  येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top