Krushi Seva Kendra Licence कृषी सेवा केंद्रासाठी परवाना कसा काढावा? जाणून घेऊया संपूर्ण माहिती |

Krushi Seva Kendra Licence

Krushi Seva Kendra Licence प्रत्येक गावात तसेच तालुक्यात कृषी सेवा केंद्रांची दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येतात. कृषी सेवा केंद्र हे कृषी पदवीधरांसाठी व्यवसायाचे साधन बनत आहे. रासायनिक खते, किटकनाशके, बियाणे यांची विक्री कृषी सेवा केंद्रामधून करता येते. कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी कृषी विभागाकडून रीतसर परवाना घेणे आवश्यक आहे.

कृषी सेवा केंद्रासाठी परवाना कसा काढावा, आवश्यक कागदपत्रे कोणती, तसेच अर्ज कुठे करावा याविषयीची माहिती बघणार आहोत. लेख पूर्ण वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

Krushi Seva Kendra Licence आवश्यक कागदपत्रे:

  • शॉप अॅक्ट प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पत्रतेचे प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र
  • ज्या जागेवर दुकान टाकायचे आहे त्या जागेचा गाव नमुना 8
  • कृषी सेवा केंद्र ज्या जागेवर सुरू करायचे आहे, ती जागा तुमच्या मालकीची नसल्यास भाडेपट्ट्याचा करार
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साइजचे फोटो
हे वाचले का?  Title Clear Property 'टायटल क्लिअर' जमीन म्हणजे नेमकं काय?

येथे क्लिक करून पहा अर्ज कुठे करावा

अर्ज करण्यासाठी किती शुल्क लागते?

तुम्ही काय विक्रीसाठी लायसेंस काढत आहात, त्यानुसार अर्ज शुल्क ची रक्कम आहे.

किटकनाशके विक्री परवाना: 7,500 रुपये

रासायनिक खते विक्री परवाना: 450 रुपये

बियाणे विक्री परवाना: 1,000 रुपये

येथे क्लिक करून पहा अर्ज कुठे करावा

कृषी सेवा केंद्र परवाना रद्द कधी होतो?

  1. प्रत्येक 5 वर्षांनी कृषी सेवा केंद्र परवान्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. जर नूतनीकरण नाही केले तर परवाना रद्द होऊ शकते.
  2. जर कृषी सेवा केंद्रातून बेकायदेशिररित्या खते, बियाणे तसेच किटकनाशके यांची विक्री होत असेल. आणि ही बाब स्थानिक पातळीवरील अधिकार्‍यांच्या लक्षात आली आणि यासाठी जिल्हा कृषी अधीक्षकांनी दोषी ठरवले तर परवाना रद्द होऊ शकतो.
हे वाचले का?  Grampanchayat Yojana चालू ग्रामपंचायत योजना कशी पहाल?

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top