शासन निर्णयान्वये शासनाने रास्तभाव / रेशन दुकानांमध्ये मिळणार किराणा विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांबाबतचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन एकत्रित आदेश निर्गमित केले आहे.
सदर एकत्रित आदेशानुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वितरीत होणाऱ्या वस्तूंसह खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री रास्तभाव दुकानातून करण्यास परवानगी देण्यात आली होती.
सदर खुल्या बाजारातील आणखी काही वस्तू रास्तभाव / शिधावाटम दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे.
शासन निर्णय
या शासन निर्णयान्वये उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयातील नमूद वस्तूंसह खुल्या बाजारातीलसाबण (आंघोळ व धुण्याचा), हॅण्डवॉश, डिटर्जेंटस (घुण्याचा सोडा), शाम्पू, चहापत्ती व कॉफीरास्तभाव / शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास शासन मान्यता देत आहे.
ही परवानगी अस्थायी स्वरुपात देण्यात येत असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात वेळोवेळी होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येईल.
उपरोक्त वस्तूंचे दुकानापर्यंत वितरण व विक्रीपोटी मिळणारे कमिशन यानावत रास्तभाव दुकानदारांनी संबंधित कंपनीच्या वितरकाशी परस्पर संपर्क साधावा. हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रास्तभाव दुकानदार यामध्ये राहील.
यात शासनाचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही.
नव नवीन माहिती
- Shet Rasta Yojana प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी मिळणार रस्ता – शासन राबविणार समग्र शेतरस्ता योजना
- Varas Nond Process वारस नोंद: शेतजमिनीचा वारसा मिळवण्याची कायदेशीर आणि सोपी पद्धत | माहिती असायलाच हवी |
- Pik Vima 2025 खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा अर्ज सुरु, ही आहे शेवटची तारीख..!
- Tukde Bandi Kayda राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय – तुकडेबंदी कायदा रद्द
- PM Kisan चा 20 वा हप्ता मिळवायचा आहे? ‘ही’ 4 कामे तातडीने करा, नाहीतर पैसे अडकतील!
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२११११७१५३३५९५९०६ असा आहे. हा शासननिर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे..महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
हे वाचले का?
- सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यालया तक्रार अशी तक्रार केली तरच ग्राह्य धरणार.
- बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?
- कुटुंब मालमत्ता व स्वतंत्र मालमत्ता म्हणजे काय?
- हक्कसोड पत्र म्हणजे काय ? Hakka Sod Patra Mhanje Kay?
- आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.