Land Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर….

Land Records जुने अभिलेख कसे पाहावे

 • सर्वात आधी जुने अभिलेख पाहण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट सर्च करावी लागेल. ही महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट आहे. bhoomi land records
 • ती ओपन होईल. त्यामध्ये e Records असे पेज दिसेल.
 • त्या पेजच्या उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुम्हाला हवी ती भाषा सिलेक्ट करू शकता.
 • यानंतर डाव्या बाजूला चौकटीत तुम्हाला लॉगिन आणि मदत असे ऑप्शन दिसतील.
 • जर तुम्ही वेबसाईटवर लॉगिन केलेलं असेल तर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही साइटवर जाऊ शकता.
 • जर लॉगिन केलेला नसेल तर नवीन वापर कर्ता या पर्यायावर क्लिक करा.
 • त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा. तसेच तुमच्या पत्याविषयी असलेली माहिती भरा.
 • यानंतर वेबसाईटच्या निर्देशानुसार लॉगिन आयडी तयार करा. पासवर्ड टाका.
 • नंतर एका चौकटीतील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्या
 • पुढच्या बॉक्समध्ये दिलेली अक्षरे जसेच्या तसे चौकटीत टाईप करा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
 • अशा प्रकारे वापर कर्ता नोंदणी पूर्ण केली इथे क्लिक करा. व लॉगिन करण्यासाठी असा मेसेज येईल.
 • त्यावर इथे क्लिक करा यावर क्लिक करा

येथे पहा रेकॉर्ड

Land Records आता सर्वात प्रथम फेरफार उतारा कसा बघायचा ते बघूया old land records maharashtra

फेरफार उतारा असा बघा:

 • वेबसाईटवर गेल्यानंतर दिलेल्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा निवडा
 • त्यानंतर तालुका, गावाचं नाव, अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ अ असे पर्याय निवडावे लागतील.
 • यानंतर गट क्रमांक टाका व शोध या पर्यायावर क्लिक करा
 • शोध निकाल या पेजवर तुम्ही जो काही क्रमांक टाकलेला असतो त्यासंबंधीत फेरफार याविषयीची माहिती दिसते.
 • त्यामध्ये फेरफारच वर्ष आणि क्रमांक दिलेला असतो त्यावर क्लिक करून तुम्ही तुम्हाला ज्या वर्षाचा फेरफार बघायचा आहे तो बघू शकता
 • नंतर पुनरावलोकन कार्ड या पर्यायावर क्लिक करा तुमचं कार्ट ओपन होईल.
 • त्यानंतर त्याखाली दिलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
 • तेथे क्लिक केल्यानंतर डाऊनलोड सारांश एक पेज ओपन होईल.
 • इथं तुमच्या फाईल ची सद्यस्थिती उपलब्ध आहे असे दिसेल, त्या समोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे फेरफार पत्र ओपन होईल.

येथे पहा रेकॉर्ड

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top