Panchayat Samiti एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित एक गट असतो त्या गटाचा कारभार बघणारी संस्था म्हणजेच पंचायत समिती.
पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यामध्ये जोडणारा दुवा म्हणून काम करते. पंचायत समिती ही तालुका स्तरावरती काम करते. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समिती स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.
गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.
पंचायत समितीची व गटविकास अधिकारी ची कामे येथे पहा
Panchayat Samiti पंचायत समिती ची रचना
पंचायत समिती मतदार संघाला गण असे म्हणतात. प्रत्येक गणातून एक सदस्य निवडून दिल जातो. प्रत्येकी 20000 लोकसंख्येवरती एक सदस्य पंचायत समिती वरती निवडून जातो. जिल्हा परिषदेच्या एका वॉर्डमध्ये पंचायत समितीचे दोन वॉर्ड समाविष्ट असतात. म्हणजेच जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या ही पंचायत समितीवर निवडून गेलेल्या सदस्य संख्येपेक्षा दुप्पट असते.
पंचायत समितीतील आरक्षण:
- मागास प्रवर्गासाठी 27% आरक्षण असते.
- एकूण सदस्य संख्येच्या 50 टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव असते.
- अनुसूचित जाती जमातींसाठी गटातील एकूण लोकसंख्ये च्या प्रमाणात जागा राखीव असतात.
पंचायत समितीची व गटविकास अधिकारी ची कामे येथे पहा
पंचायत समितीचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो. दर पाच वर्षांनी पंचायत समितीच्या निवडणुका होत असतात. पंचायत समितीचा कार्यकाल कमी जास्त करण्याचा अधिकार राज्य शासनास असतो.
पंचायत समितीची निवडणूक ही प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होत असते.
पंचायत समितीचे पदाधिकारी
पंचायत समितीमध्ये निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सभापती व दुसऱ्या ची उपसभापती म्हणून निवड करतात. पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर पहिल्याच सभेत सभापतीची निवड केली जाते. सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती काम बघतात. सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीत जर दोन व्यक्तींना समान मत मिळाली, तर चिठ्ठ्या टाकून सभापती उपसभापती ची निवड केली जाते.
सभापती व उपसभापती चा कार्यकाल अडीच वर्षे असतो. पंचायत समितीचे सदस्य व उपसभापती यांना राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांना आपला राजीनामा सभापतीकडे सादर करावा लागतो आणि सभापतींना राजीनामा द्यावयाचा असल्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सादर करावा लागतो.
पंचायत समितीची व गटविकास अधिकारी ची कामे येथे पहा
प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची एक सभा होणे आवश्यक असते. पंचायत समितीला राज्य शासनाकडून तसेच जिल्हा परिषदे कडून विविध कामांसाठी निधी मिळत असतो.
सभापतींची कामे:
- पंचायत समिती ची मालमत्ता तपासण्याचा अधिकार सभापतींना असतो.
- पंचायत समितीच्या सभा बोलावणे व त्याचे अध्यक्ष पद भूषवणे.
- पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून विविध कागदपत्रे मागवणे, विविध कामांचा अहवाल मागवणे, हिशेब मागवणे याचा अधिकार सभापतीस असतो.
- पंचायत समिती व जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या कामांची पाहणी करणे.
हे वाचले का?
- ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
- शेतात DP (Transformer) टॉवर असेल तर मिळतो मोबदला.
- ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!
- तुमची केस लढण्या करता मोफत वकील अर्ज कसा करावा?
- जमीन NA करण्याची गरज नाही (Jamin NA karnyachi garaj nahi).
- सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.