Maharashtra Election 2024 महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र मध्ये एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ हा पाच जानेवारी रोजी संपणार आहे.
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करतेवेळी निवडणूक आयोगाने सांगितले होते की, सण आणि उत्सवांचा विचार करूनच निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील.
दिवाळीचा सण हा 29 ऑक्टोबर पासून तीन नोव्हेंबर पर्यंत आहे छटपूजा 6 नोव्हेंबर पर्यंत साजरी केली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये मागील निवडणूक ही 21 ऑक्टोबर 2019 ला झाली होती. या निवडणुकीमध्ये २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. या निवडणुकांचा निकाल हा 24 ऑक्टोबरला जाहीर केला होता. तर झारखंडमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाच टप्प्यांमध्ये पार पडला होता .
तरुणांना मिळणार प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये |
महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी ही 23 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
Maharashtra Election 2024 असे असेल विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक:
अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)
अर्ज पडताळणीची तारीख: 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर 2024 (सोमवार)
मतदानाचा दिवस: 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणीची तारीख: 23 नोव्हेंबर 2024
Maharashtra Election 2024 निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. महाराष्ट्र मध्ये एकूण 9.63 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 4.97 कोटी पुरुष मतदार तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत.
महाराष्ट्रामध्ये एकूण 1,186 मतदान केंद्र आहेत. शहरी भागातील मतदान केंद्रांची संख्या ही 42604 तर ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची संख्या 57,582 आहे. निवडणूक आयोग 530 मॉडेल मतदान केंद्र बनवणार आहे.
झारखंड मध्ये एकूण 81 विधानसभेच्या जागा आहेत झारखंड विधानसभेचे मुदत ही 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. झारखंडमध्ये एकूण 2 कोटी 60 लाख मतदार आहेत. त्यापैकी 1.29 कोटी महिला मतदार तर 1 कोटी 30 लाख पुरुष मतदार आहेत.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा