पोलीस पाटील (Police Patil) निवडणूक लढवता येते का ?

पोलीस पाटील (Police Patil)

पोलीस पाटील अथवा पोलीस पाटील पदाचा उमेदवार यांनी सहकारी संस्थेचा सदस्य / पदाधिकारी राहणे अथवा सहकारी संस्थेची निवडणूक लढविणे बाबत. महाराष्ट्र शासन यांनी 2 जुन 2022 रोजी शासन निर्णय काढला आहे. याच विषयांवरील सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. पोलीसपाटील संघटनांच्या मागण्यांबाबत मा.मंत्री (गृह) यांच्याकडे दि.३.१२.२०२० रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

सहकारी संस्थामध्ये पोलीस पाटील (Police Patil) निवडणूक लढवू शकतो असे शासनपत्र असतानाही बऱ्याच ठिकाणी नियुक्ती प्राधिकारी (जिल्हाधिकारी) हे पोलीस पाटील यांचे निलंबन करतात या मुद्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याअनुषंगाने यासंदर्भात स्पष्टता आणण्याबाबत पोलीस पाटील (Police Patil) संघटनांनी शासनाकडे मागणी केली आहे.

पोलीस पाटील (Police Patil) निवडणूक परिपत्रक:

२. विषयाधीन प्रकरणी शासनपत्र दि. १० मे, १९८३ अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत. पोलीस पाटील हा गावातील शासनाचा निवासी प्रतिनिधी असतो. त्याच्या पदाचा दर्जा, कामाची भूमिका आणि जबाबदाऱ्या पाहता, त्यांनी कोणत्याही राजकीय कार्यात स्वत:ला सहभागी करुन घेणे अपेक्षित नाही.

हे वाचले का?  Vidhi Seva Pradhikaran तुमची केस लढण्या करता मोफत वकील अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ५(१) नुसार पोलीस पाटील यांना राजकारणात भाग घेण्यापासून अथवा विधानमंडळाच्या अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणूकीत सहभाग घेण्यास प्रतिबंधीत केले आहे.

Police Patil पदासाठीचा उमेदवार हा कोणत्याही राजकीय पक्ष किंवा राजकीय संघटनेचा सदस्य, किंवा त्यांच्याशी संलग्न असता कामा नये. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी किंवा सदस्य यांचा Police Patil पदासाठी उमेदवार म्हणून विचारात घेतले जाऊ शकतात.

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

तथापि, त्यासर्व पदावरुन प्रत्यक्षात राजीनामा दिल्यानंतरच त्यांची नियुक्ती Police Patil पदावर केली जाऊ शकते. पोलीस-पाटील यांना मानधन दिले जाते, वेतन दिले जात नाही, म्हणून त्यांना स्वतःचे असे स्वतंत्र उपजिविकेचे / उदरनिर्वाहाचे साधन असणे अपेक्षित आहे.

जर तो शेती करत असेल किंवा स्थानिक व्यवसाय किंवा व्यापार करीत असेल तर हे काम त्यांच्या पाटील पदाच्या कर्तव्यास हानिकारक अथवा बाधा निर्माण करणारे असता कामा नये. म्हणूनच त्याने सर्व साधारणपणे कार्यरत असतानाच्या कार्यकाळात कोणत्याही सहकारी संस्थेशी संबंध ठेवू नये, अशी अपेक्षा करणे अवास्तव / अवाजवी आहे.

हे वाचले का?  ST कर्मचार्‍यांना राज्य शासकीय कर्मचारी समाऊन घेण्याच्या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत

परिणामी पोलीस पाटील अथवा Police Patil पदाचा उमेदवार, सहकारी संस्थेचा सदस्य अथवा पदाधिकारी राहू शकतो किंवा त्यासाठी निवडणूक लढू शकतो, या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांस लागू असलेली महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १६ (३) ची तरतूद, Police Patil यांना लागू नाही. या सूचनांचा पुनरुच्चार करण्यात येत आहे..

३. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ कअ मध्ये समितीची आणि तिच्या सदस्यांची निरर्हता स्पष्ट करण्यात आली आहे. कलम ७३ क अ मध्ये तसेच सदर अधिनियमातील इतर कलमांत देखील पोलीस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणूका लढविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करण्यात आल्याची तरतूद नाही.

४. उपरोक्त विवेचन लक्षात घेता, सर्व नियुक्ती प्राधिकारी (जिल्हाधिकारी) यांना सूचित करण्यात येते की, सहकारी संस्थांची निवडणूक लढविणे किंवा त्यामध्ये पदाधिकारी म्हणून पद भूषविणे याकरता Police Patil यांची अडवून करू नये

हे वाचले का?  No work Pendency सात दिवसांत अर्ज/फाइल वर काम होणार नाही तर अधिकारी यांच्यावर कारवाई होणार महाराष्ट्र सरकारचा निर्णय

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

पोलीस पाटीला निवडणूक लढवता येते GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top